Aai kuthe kay karte fame madhurani prabhulakar got emotional sharing her old memories of the serial
1 / 30

‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, अरुंधती झाली भावुक; म्हणाली…

'आई कुठे काय करते' ही लोकप्रिय मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. २०१९पासून सुरू झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. अरुंधतीची भूमिका साकारणारी मधुराणी प्रभुलकर महाराष्ट्राची लाडकी आई ठरली. मात्र, सातत्याने बदलणारे ट्रॅक प्रेक्षकांना रटाळ वाटू लागले, त्यामुळे मालिकेची वेळ बदलली आणि आता ती बंद होणार आहे. मधुराणीने या प्रवासाबद्दल भावुक प्रतिक्रिया दिली.

Swipe up for next shorts
donald trump (2)
2 / 30

US Election: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प, कमला हॅरीस पराभूत!

गेल्या महिन्याभरात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा झाली. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी मतदानाला सुरुवात होऊन बुघवारी पहाटे मतमोजणी झाली. रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाल्याने डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. ओहियोमध्ये शेरॉड ब्राऊन यांचा बर्नी मोरेनो यांनी पराभव केला. विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया आणि मिशिगनमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने कडवी झुंज दिली.

Swipe up for next shorts
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
3 / 30

कमला हॅरीस यांनी पराभव स्वीकारला? रात्रीचं भाषण रद्द; प्रचारक म्हणतात…

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस यांच्यातील अटीतटीच्या लढतीत डोनाल्ड ट्रम्प २४६ मतांनी आघाडीवर आहेत, तर कमला हॅरिस यांना १८२ मते मिळाली आहेत. निकाल स्पष्ट होत असल्याने कमला हॅरिस यांनी रात्रीची सभा रद्द केली आहे. त्यांच्या सल्लागारांनी सांगितले की, अद्याप अनेक मतांची मोजणी बाकी असल्याने त्या इलेक्शन नाईटमध्ये बोलणार नाहीत.

Swipe up for next shorts
Devendra Fadnavis on Rahul Gandhi
4 / 30

“राहुल गांधी लाल संविधान दाखवून कोणाला इशारा देताय?”, देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल!

राहुल गांधी यांच्या भारत जोडो आंदोलनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी लाल रंगाचं संविधानाचं पुस्तक घेऊन फिरत आहेत, ज्यामुळे अराजकता पसरवणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळत आहे. त्यांनी दावा केला की, या आंदोलनामुळे देशाच्या एकतेला धोका निर्माण होईल आणि अर्बन नक्षलवादाला प्रोत्साहन मिळेल.

shani dev margi 2024 today horoscope
5 / 30

१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात;

देवगुरु गुरु आणि राक्षसांचे गुरु शुक्र एका ठराविक काळानंतर राशी बदल करतात, ज्याचा निश्चितपणे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव पडतो. या वर्षी गुरु फक्त वृषभ राशीत असेल, तर शुक्र दर २६ दिवसांनी आपली राशी बदल करतो. अशात ७ नोव्हेंबरला शुक्र धनु राशीत प्रवेश करेल. शुक्राचा गुरुच्या राशीत प्रवेश झाल्यामुळे आणि गुरु शुक्राच्या वृषभ राशीत असल्यामुळे परिवर्तन राजयोग तयार होत आहे. अशा स्थितीत दोन्ही ग्रह काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळवू शकतात.

When Aishwarya Rai Bachchan shared her tips for glowing skin
6 / 30

वयाच्या पन्नाशीतही तजेलदार त्वचा असणाऱ्या ऐश्वर्या रायच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य?

अनेक तरुणी मुली पुरळ, कोरडी किंवा तेलकट त्वचा अशा कित्येक समस्यांचा सामना करतात, पण अभिनेत्री ऐश्वर्या रायची त्वचा वयाच्या पन्नाशीमध्येही तितकीच उजळ आणि तजेलदार दिसत आहे. एक सुप्रसिद्ध बॉलीवूड सेलिब्रिटी म्हणून ती बऱ्याचदा चर्चेत असते; परंतु तिच्या स्किनकेअरमुळे सध्या ती चर्चेत आली आहे. २०२४ मध्ये Harper’s Bazaar UK ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने तिची सुव्यवस्थित दैनंदिन दिनचर्या (streamlined daily routine) शेअर केली आहे, ज्यानुसार ती भरपूर पाणी पिणे (हायड्रेशन) स्वच्छता आणि आराम यांना प्राधान्य देते.

Madhureema Raje Chhatrapati
7 / 30

“…म्हणून मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे”, अखेर शाहू छत्रपतींनी सोडलं मौन

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत गोंधळ झाला. मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेतल्याने काँग्रेसला मानहानी सहन करावी लागली. शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले की, सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी उमेदवारी मागे घेतली. राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. सतेज पाटील यांच्याशी कोणताही वाद नसल्याचेही त्यांनी सांगितले.

What Raj Thackeray Said About Sharad Pawar
8 / 30

“आमच्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये..”, राज ठाकरेंची टीका

राज ठाकरे यांनी यवतमाळच्या राळेगाव येथे सभा घेतली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकास आराखड्याबद्दल मनसे हा पहिला पक्ष असल्याचे सांगितले. शरद पवारांना जातीपातींमध्ये द्वेष पसरवणारे संत म्हणत टीका केली. लाडकी बहीण योजनेवरही टीका करत, फुकट गोष्टी न देता काम देण्याचे आश्वासन दिले. मतदान प्रक्रियेचे महत्त्व सांगत, अशोक मेश्राम यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Underrated Thriller Movies on OTT
9 / 30

डोकं चक्रावणारे ट्विस्ट असलेले ‘हे’ चित्रपट आहेत OTT वर, वाचा यादी

भारतात अनेक थ्रिलर चित्रपट बनतात, परंतु काहींना तेवढी लोकप्रियता मिळत नाही. 'रात अकेली है', 'मोनिका, ओ माय डार्लिंग', 'दृश्यम 2', 'सी यू सून', 'जॉनी गद्दार' आणि 'कप्पेला' हे असेच काही चित्रपट आहेत. हे चित्रपट नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहेत. या चित्रपटांमध्ये अनेक ट्विस्ट आहेत आणि त्यांना आयएमडीबीवर चांगले रेटिंग मिळाले आहे.

maharashtra assembly election 2024
10 / 30

काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान १५ दिवसांवर आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात मुख्य लढत होणार आहे. सत्ताधारी महायुतीने विविध योजना जाहीर केल्यामुळे त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे, तर लोकसभा निकाल विरोधकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. पक्षफुटीमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहेत. महाविकास आघाडीने काँग्रेसला १०१, शिवसेना (उद्धव) ९२, राष्ट्रवादी (शरद) ८७ जागा दिल्या आहेत. महायुतीत भाजप १४८, शिवसेना (शिंदे) ८५, राष्ट्रवादी (अजित) ५४ जागांवर लढणार आहेत.

Sunil Tatkare Mahayuti
11 / 30

“सुनील तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर”, शिंदे गटाच्या आमदाराची बोचरी टीका

रायगड जिल्ह्यातील महायुतीत जागावाटपावरून वाद झाला आहे. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, परंतु त्यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना सुनील तटकरेंचं पाठबळ असल्याचा दावा थोरवे यांनी केला आहे. थोरवे यांनी सुनील तटकरे महायुतीला धोका देत असल्याचा आरोप केला आहे आणि तटकरे यांना महायुतीला लागलेला कॅन्सर म्हटले आहे.

Bollywood Actors Salman Khan ex-girlfriend Somy Ali claimed that Sushant Singh Rajput was murdered
12 / 30

“सुशांतची हत्याच केली”, सलमानच्या एक्स गर्लफ्रेंड दावा; म्हणाली, “एम्सच्या डॉक्टरांनी…”

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. सलमान खान संबंधित सातत्याने सोमी विधान करताना दिसत आहे. तसंच काही धक्कादायक खुलासे करत आहे. अशातच आता सोमी अलीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी विधान केलं आहे. त्यामुळे सोमी अली पुन्हा एकदा अधिकच चर्चेत आली आहे.

Bigg Boss 18 Rupali Bhosle fire on Vivian dsena
13 / 30

रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली..

अभिनेत्री रुपाली भोसलेने नुकतीच इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘बिग बॉस’च्या १३व्या पर्वाचा विजेता दिवंगत सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख केला आहे आणि 'बिग बॉस १८'मधील एका सदस्यावर टीका केली आहे. रुपालीच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Bhau Kadam AJit Pawar
14 / 30

चला हवा येऊ द्या फेम अभिनेता करणार अजित पवारांचा प्रचार, लाडकी बहीण योजनेविषयी म्हणाला…

निवडणुकीच्या प्रचारासाठी भाऊ कदम राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत. अजित पवारांनी कलाकारांच्या समस्यांवर लक्ष दिल्यामुळे भाऊ कदम त्यांचा प्रचार करणार आहेत. भाऊ कदम यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांच्या कामाची प्रशंसा केली. त्यांनी अद्याप पक्षप्रवेश केलेला नसला तरी प्रचारात सहभागी होणार आहेत. सुनील तटकरे आणि सिद्धार्थ कांबळे प्रचाराचे नियोजन करतील.

Somy Ali on salman khan aishwarya rai relation
15 / 30

“ती सलमानबरोबर असताना…”, भाईजानच्या एक्स गर्लफ्रेंडने ऐश्वर्या रायबद्दल केलं मोठं वक्तव्य

अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हैदराबादमध्ये 'सिंकदर' चित्रपटाचं शूटिंग करत असताना, त्याची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने त्याच्याबरोबरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. तिने सलमानच्या 'वन नाईट स्टँड' आणि शारीरिक अत्याचाराबद्दल सांगितलं. सोमीने सलमानच्या बेवफाईमुळे नातं संपवलं आणि ऐश्वर्या रायबद्दलही भाष्य केलं. तिने लॉरेन्स बिश्नोईला बॉलीवूडचा दाऊद म्हटलं.

Bigg Boss 18 rajat dalal shayari on Vivian dsena group watch video
16 / 30

रजत दलालने शायरीतून विवियन डिसेनाच्या ग्रुपला लगावला टोला; नेटकरी म्हणाले, “एक नंबर भाई…”

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात दोन वाइल्ड कार्ड सदस्यांची एन्ट्री झाल्यापासून घरातील वातावरण बदललं आहे. दिग्विजय सिंह राठी आणि कशिश कपूर हे दोघं वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस’च्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सध्या दोघं घरातील सगळ्या सदस्यांबरोबर चर्चा करत आहेत. कोणत्याही ग्रुपमध्ये सामील झालेले नाहीत. पण, सध्या विवियन डिसेनाच्या ग्रुपची खूप चर्चा सुरू आहे.

Uddhav thackeray Manifesto
17 / 30

सुरतमध्ये महाराजांचं मंदिर, मुलांना मोफत शिक्षण अन्; ठाकरेंनी कोणी वचने दिली?

राज्यात मुलींना मोफत उच्चशिक्षणाची सोय आहे. आता राज्यातील मुलांनाही मोफत शिक्षण देण्याचं वचन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. ते राधानगरी – भुदरगड मतदारसंघात के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ बोलत होते. मुलगा आणि मुलगी दोघेही महाराष्ट्राचे आधारस्तंभ आहेत, असं त्यांनी सांगितलं. तसेच, सुरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आणि महिला पोलिसांच्या रिक्त पदांची भरती करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

Indias most expensive film flopped after row over same sex kiss
18 / 30

दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, ८०च्या दशकात १० कोटींचे बजेट असून ठरला फ्लॉप

बॉलीवूड November 5, 2024

१९८३ मध्ये रिलीज झालेला 'रझिया सुलतान' हा कमाल अमरोही यांचा चित्रपट होता. १० कोटींच्या बजेटमुळे तो तेव्हाचा सर्वात महागडा चित्रपट होता. हेमा मालिनी, धर्मेंद्र, परवीन बाबी यांसारखे कलाकार असूनही चित्रपट फ्लॉप ठरला. समलिंगी किसिंग सीनमुळे वाद निर्माण झाला. अमरोही यांनी कर्ज घेऊन चित्रपट बनवला, पण फ्लॉप झाल्याने आर्थिक फटका बसला. १९९३ मध्ये अमरोही यांचे निधन झाले आणि 'रझिया सुलतान' त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.

Marathi actress vishakha subhedar these post viral
19 / 30

विशाखा सुभेदारने माहेरपणाबद्दल लिहिलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बहिणीच्या उवा…”

नाटक, मालिका, चित्रपट या तीनही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने अढळ स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली विशाखा सुभेदार सध्या मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळत आहे. नुकतीच विशाखाने माहेरपणाविषयी सुंदर पोस्ट लिहिली आहे; जी सध्या व्हायरल होतं आहे.

sharad pawar retirement (1)
20 / 30

Video: शरद पवारांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत, राज्यसभेतही जाणार नाही? भाषणात म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी बारामतीत युगेंद्र पवारांच्या प्रचारसभेत राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्यांनी ५५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आणि पुढील पिढीला संधी देण्याची गरज व्यक्त केली. लोकसभा निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला असून, समाजकारण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या निवृत्तीच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan?
21 / 30

“आजही आठवतं, वडिलांचं रक्त माझ्या हातांना लागलं होतं…”, पूनम महाजन भावूक

मुंबई November 5, 2024

पूनम महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येबाबत खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या की, प्रमोद महाजन यांची हत्या कौटुंबिक नव्हती, तर मोठं षडयंत्र होतं. त्यांच्या हत्येचा प्रसंग आठवताना पूनम महाजन भावुक झाल्या. त्या म्हणाल्या की, संघर्षाला महत्त्व आहे आणि तक्रार करणं त्यांचा स्वभाव नाही. प्रमोद महाजन यांच्या शिकवणीवर त्या पुढे जात आहोत असंही पूनम महाजन म्हणाल्या.

sharad ponkshe on maharashtra assembly election
22 / 30

“…तेव्हा आपले सांस्कृतिक मंत्री म्हणाले, तुम्ही नथुराम करत होता?” शरद पोंक्षेंची टोलेबाजी!

सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश करून उपनेतेपदाची जबाबदारी घेतली होती. मात्र, सोमवारी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपीठावर अविनाश जाधव यांच्या प्रचारासाठी दिसले. भाषणात त्यांनी राजकीय टोलेबाजी करताना, सांस्कृतिक मंत्र्यांवर टीका केली आणि आमदार-खासदारांच्या अज्ञानावर नाराजी व्यक्त केली. पोंक्षेंनी लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवरही प्रश्न उपस्थित केले.

mazhi tuzhi reshimgaath fame myra vaikul little Brother ears were pierced video viral
23 / 30

Video: मायरा वायकुळच्या चिमुकल्या भावावर झाले कर्णवेध संस्कार, पाहा व्हिडीओ

‘झी मराठी’ वाहिनीच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली मायरा वायकुळ सध्या तिच्या छोट्या भावाबरोबर एन्जॉय करत आहे. मायरा आता मोठी ताई झाली आहे. नुकतीच तिने आपल्या चिमुकल्या भावाबरोबर पहिली भाऊबीज साजरी केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता मायराच्या चिमुकल्या भावावर कर्णवेध संस्कार झाले आहेत. याचा व्हिडीओ मायराच्या भावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

athiya shetty net worth
24 / 30

वडील सुपरस्टार, पण लेकीचे सर्व चित्रपट ठरले फ्लॉप, ‘इतक्या’ कोटींची मालकीण आहे अभिनेत्री

बॉलीवूड November 5, 2024

बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टीचा आज ३२ वा वाढदिवस आहे. २०१५ मध्ये 'हीरो' चित्रपटातून पदार्पण करणारी अथिया, मोजक्याच चित्रपटात दिसली आणि तिचे सर्वच चित्रपट फ्लॉप झाले. दोन वर्षांपूर्वी तिने क्रिकेटपटू केएल राहुलशी लग्न केलं. फिल्मी करिअर यशस्वी नसतानाही, अथियाची संपत्ती ३० कोटी रुपये आहे. ती विविध ब्रँड्सच्या जाहिराती व सोशल मीडियावरून चांगली कमाई करते.

Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
25 / 30

मराठी अभिनेत्रींना हिंदीत कामवाल्या बाईचं काम का दिलं जातं? तृप्ती खामकरने सांगितलं सत्य

बऱ्याचदा मराठी अभिनेत्रींना हिंदीत कामवाल्या बाईचं काम मिळतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वणिता खरात ‘कबीर सिंग’ चित्रपटात कामवाल्या बाईच्या भूमिकेत झळकली होती. तसंच अभिनेत्री तृप्ती खामकरने ‘गोविंदा नाम मेरा’ चित्रपटात कामवाल्या बाईची भूमिका साकारली होती. पण, मराठी अभिनेत्रींना हिंदी कामावल्या बाईचं काम का मिळतं? यामागचं सत्य तृप्ती खामकरने सांगितलं.

What Devendra Fadnavis Said About Brahmin Cast
26 / 30

‘ब्राह्मण असणं राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरतंय का?’ देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जात…”

राज्यात २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार येईल असा दावा केला आहे. 'देवाभाऊ' हे नाव कार्यकर्त्यांनी दिलं असून त्यांना ते आवडतं. लाडकी बहीण योजनेवर काँग्रेसने टीका केली होती. ब्राह्मण असल्याचा राजकीय तोटा नाही, जात नेत्यांच्या मनात असते, लोकांच्या नाही, असं फडणवीस म्हणाले.

Bengaluru Diwali Firecrackers accident
27 / 30

Video: फटाक्याच्या बॉक्सवर बसण्याची पैज भारी पडली; बेरोजगार युवकाचा दुर्दैवी मृत्यू

बंगळुरूमध्ये दिवाळी साजरी करताना एक धक्कादायक घटना घडली. ३२ वर्षीय बेरोजगार सबरीशने मित्रांनी लावलेली पैज स्वीकारून फटाक्याच्या बॉक्सवर बसण्याचे आव्हान घेतले. फटाका फुटल्याने सबरीशचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Drashti Dhami First Photo with Newborn Daughter
28 / 30

लग्नानंतर ९ वर्षांनी आई झाली प्रसिद्ध अभिनेत्री, पहिल्यांदाच शेअर केला गोंडस लेकीचा फोटो

टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी, जी 'मधुबाला' मालिकेतून प्रसिद्ध झाली, आई झाली आहे. २२ ऑक्टोबर रोजी तिने मुलीला जन्म दिला. तिने इन्स्टाग्रामवर पती नीरज खेमकासोबत मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दृष्टीने २०१५ मध्ये नीरजसोबत लग्न केले होते आणि आता नऊ वर्षांनी ते दोघे आई-बाबा झाले आहेत.

What Devendra Fadnavis Said?
29 / 30

महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचं धोरण…”

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस उरले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही जिंकण्याचा दावा करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संगीत खुर्चीसारखी कोणतीही स्पर्धा नसल्याचे सांगितले. त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले, पण नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले. आता महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात निवडणुकीचा सामना रंगणार आहे.

PM Narendra Modi on Hindu Temple Attack in Canada
30 / 30

कॅनडात हिंदू मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून कडक शब्दात निषेध

कॅनडाच्या ब्रॅम्प्टन भागात खलिस्तानवाद्यांनी हिंदू मंदिरावर हल्ला केला. पंतप्रधान मोदींनी या घटनेचा निषेध करताना, हा हल्ला राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकाविण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. भारत आणि कॅनडामध्ये तणावाचे संबंध असून, खलिस्तानी अतिरेक्यांच्या हत्येमुळे हा तणाव वाढला आहे. मोदींनी कॅनडातील खलिस्तानवाद्यांविरोधात ठाम भूमिका घेतली आहे.