‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने घेतलं विठ्ठलाचं दर्शन, म्हणाली…
गेल्या वर्षी ३० नोव्हेंबरला ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला, तरी यामधील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळेच ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. या मालिकेतील अरुंधती तर महिलासाठी आयडॉल आहे. अभिनेत्री मुधराणी प्रभूलकरने अरुंधती ही भूमिका उत्कृष्टरित्या पेलली. त्यामुळे अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. नुकतंच मधुराणी प्रभुलकरने पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.