Bigg Boss Marathi 5: ‘या’ स्पर्धकाला रियुनियननंतर ग्रँड फिनालेतही स्थान नाही
बिग बॉस मराठी ५ चा ग्रँड फिनाले आज पार पडत आहे. ७० दिवसांच्या मनोरंजनानंतर विजेता ठरणार आहे. टॉप ६ स्पर्धकांमध्ये अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर आहेत. सर्व एलिमिनेटेड स्पर्धकांना बोलावण्यात आलंय, पण आर्या जाधवला नाही. निक्की तांबोळीला मारल्यामुळे आणि नियम मोडल्यामुळे तिला निष्कासित करण्यात आलं होतं.