एजाज खानने एक्स गर्लफ्रेंडवर धर्मांतरासाठी दबाव टाकण्याच्या आरोपांवर दिलं उत्तर
अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि अभिनेता एजाज खान यांचे वर्षभरापूर्वी ब्रेकअप झाले. 'बिग बॉस १४' पासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रेमप्रवासात अनेक अडचणी आल्या. पवित्राने धर्मांतराबाबत भाष्य केल्याने एजाजवर आरोप झाले. एजाजच्या टीमने हे आरोप फेटाळले आणि त्यांच्या नात्यात धर्म कधीच महत्त्वाचा मुद्दा नव्हता, एजाज सर्व धर्मांचा आदर करतो असे स्पष्ट केले. त्याच्या वडिलांनीही पवित्रामुळे झालेल्या आरोपांबद्दल नाराजी व्यक्त केली.