अभिनेत्याने केली आत्महत्या, घरात गळफास घेऊन संपवलं जीवन
अभिनेता ललित मनचंदाने आत्महत्या केली आहे. मेरठ येथील राहत्या घरी गळफास लावून त्यांनी जीवन संपवलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मॉर्टमसाठी पाठवला आहे. ललितने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं होतं. मागील काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट नाही, आणि पोलिस तपास सुरू आहे. त्यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला आहे.