एसीपी प्रद्युमनच्या मृत्यूनंतर CID 2 मध्ये शिवाजी साटम यांची जागा घेणार ‘हा’ अभिनेता
१९९८ साली सुरू झालेली ‘सीआयडी’ मालिका तुफान गाजली. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आजही बऱ्याच प्रेक्षकांना ‘सीआयडी’ मालिकेचं वेड आहे. मालिकेचे जुने भाग प्रेक्षक आवडीने बघत असतात. सध्या ‘सीआयडी’चं दुसरं पर्व सुरू आहे. या मालिकेतील आता मुख्य पात्र एसपी प्रद्युमनचा मृत्यू दाखवला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे एसपी प्रद्युमन साकारणारे शिवाजी साटम यांची एक्झिट होणार आहे. आता ‘सीआयडी २’ मध्ये शिवाजी साटम यांची जागा घेणाऱ्या अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे.