“मला इस्लाममधील…”, आंतरधर्मीय लग्न करणारी अभिनेत्री पहलगाम हल्ल्याबद्दल म्हणाली…
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हल्ल्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये होते. दिल्लीत परतल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर सुरक्षित असल्याची माहिती दिली, पण त्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं. दीपिकाने व्लॉगमध्ये हल्ल्याचा निषेध केला आणि दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असं सांगितलं. इस्लाम सर्वांना एकमेकांचा आदर करण्याची शिकवण देतो, असंही ती म्हणाली.