दीड महिन्याच्या पिल्लावर वारंवार बलात्कार, अभिनेत्रीने केली सुटका; म्हणाली, “एका चाळीत…”
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम जया भट्टाचार्यने नायगाव भागातून एका दीड महिन्याच्या श्वानाच्या पिल्लाची सुटका केली आहे. या पिल्लावर वारंवार बलात्कार झाला होता. आरोपीला अटक झाली पण नंतर जामीन मिळाला. जयाने संताप व्यक्त करत पिल्लाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक संताप व्यक्त करत आहेत आणि कठोर शिक्षेची मागणी करत आहेत. शिबानी दांडेकरने मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.