ऐश्वर्या नारकरांची ऑनस्क्रीन लेक अडकली लग्नबंधनात; ‘ही’ अभिनेत्री होती पाठराखीण, पाहा फोटो
मराठी सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. 'या सुखांनो या' मालिकेत बालकलाकार म्हणून झळकलेली श्रद्धा रानडे नुकतीच विवाहबद्ध झाली. तिच्या लग्नाचे फोटो अभिनेत्री अन्वीता फलटणकर हिने शेअर केले आहेत. श्रद्धाने 'भाग्यविधाता', 'ममता', 'या सुखांनो या', 'खेळ मांडला' या मालिकांमध्ये काम केले आहे. तिने भरतनाट्यमचे धडे घेतले असून डी जी रुपारेल कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी घेतली आहे. चाहते तिला नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.