‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे म्हणाले, शरद पवारांची सूचना…
अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटामुळे ऐतिहासिक चित्रपट आणि मालिकांची चर्चा सुरू झाली आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या शेवटाबाबत काही प्रश्न उपस्थित झाले होते. डॉ. अमोल कोल्हे यांनी व्हिडीओद्वारे या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी स्पष्ट केले की, मालिकेचा शेवट माध्यमांच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे बदलला गेला होता, शरद पवारांचा यात कोणताही हस्तक्षेप नव्हता.