“एक रिक्षावाला त्याची पॅन्ट काढायचा अन्…”, अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
अनिता हसनंदानी ही लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. तिने एका मुलाखतीत शाळेत असताना आलेला धक्कादायक अनुभव सांगितला. ९-१० वर्षांची असताना एक रिक्षावाला विक्षिप्तपणे वागायचा. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींकडे बघून अश्लील कृत्य करायचा, त्यामुळे तिने शाळेचा रस्ता बदलला होता, असंही तिने सांगितलं.