अविनाश-ऐश्वर्या नारकरांचा सतत Reel व्हिडीओ करण्यामागे आहे ‘हा’ हेतू, अभिनेते म्हणाले…
अभिनेते अविनाश नारकर यांचं सध्या ‘पुरुष’ नावाचं नाटक रंगभूमीवर जोरदार सुरू आहे. जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मराठी नाट्यसृष्टीतील गाजलेलं ‘पुरुष’ नाटक पुन्हा रंगभूमीवर पाहायला मिळत आहे. या नाटकात अविनाश नारकर यांच्यासह स्पृहा जोशी, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे आणि शरद पोंक्षे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पुरुष’ या नाटकाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी अविनाश नारकरांनी ‘तारांगण’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी अविनाश नारकर यांनी सतत रील व्हिडीओ करण्यामागचा हेतू सांगितला.