Bigg Boss 18 Avinash Mishra, Shilpa Shirodkar, Shehzada, Eisha And 3 Others Get Nominated in 4th week
1 / 30

नॉमिनेशन प्रक्रियेदरम्यान चुम दरांगकडून झाली चूक; चौथ्या आठवड्यात ‘हे’ सदस्य झाले नॉमिनेट

Bigg Boss 18: चौथ्या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया नुकतीच पार पडली. या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट करायचं होतं. पण यामध्ये एक ट्विस्ट होता. ज्या सदस्याला नॉमिनेट केलं आहे; त्या सदस्याला करंटचा झटका दिला गेला. यावेळी चुम दरांगकडून एक चूक झाली आणि तिची इतर सदस्यांना नॉमिनेट करायची संधी हुकली. नेमकं काय घडलं? आणि कोण-कोण सदस्य नॉमिनेट झाले? जाणून घ्या…

Swipe up for next shorts
lakhat ek amcha dada serial upcoming Twist Surya and Daddy drank bhang
2 / 30

Video: सासुरवाडीत झाली गडबड, सूर्या आणि डॅडी प्यायले भांग अन् मग…; नेमकं काय घडलं? वाचा

Lakhat Ek Amcha Dada Upcoming Episode : भर लग्नमंडपातून तुळजा पळून गेल्यामुळे डॅडींनी तिचं लग्न सूर्याशी लावून दिलं होतं. एवढंच नव्हे तर ती आपल्यासाठी मेली असल्याचं सगळ्यांसमोर जाहीर केलं होतं. पण आता हे चित्र बदललेलं दिसत आहे. डॅडींनी चक्क तुळजा, सूर्या आणि त्याच्या चार बहिणींना घरी पाहुणचारासाठी बोलावलं आहे. पण याच पाहुणचाराच्या वेळी शत्रूने एक डाव रचला आहे; जो चांगलाच फसल्याचं समोर आलं आहे. याचा प्रोमो सध्या व्हायरल झाला आहे.

Swipe up for next shorts
Panchayat Season 4 shooting begins prime video share photos
3 / 30

फुलेरामध्ये पुन्हा होणार ‘पंचायत’, चौथ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात; जाणून घ्या कथा

Panchayat Season 4: ‘प्राइम व्हिडीओ’वरील लोकप्रिय वेब सीरिज ‘मिर्झापूर’चा चित्रपट येणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आली. २०२६ रोजी ‘मिर्झापूर’ सीरिजचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच आता ‘प्राइम व्हिडीओ’ने एक घोषणा करून चाहत्यांमधील उत्सुकता वाढवली आहे. बहुचर्चित आणि लोकप्रिय ‘पंचायत’ सीरिजच्या चौथ्या सीझनची घोषणा झाली असून चित्रीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा फुलेरामध्ये पंचायत होणार आहे.

Swipe up for next shorts
devendra fadnavis marathi news (1)
4 / 30

फडणवीस, डोनाल्ड ट्रम्प आणि निवडणूक निकाल… मुलाखतीत असं काय म्हणाले उपमुख्यमंत्री?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. देवेंद्र फडणवीसांनी टीव्ही ९ च्या कार्यक्रमात विविध प्रश्नांना उत्तरं दिली. लोकसभा निवडणुकीत अतीआत्मविश्वासामुळे भाजपची पीछेहाट झाली, असं त्यांनी मान्य केलं. २०१९ मध्ये शरद पवारांसोबत सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली होती, पण पवारांनी माघार घेतली. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याच्या चर्चांवर फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी करत वृत्त फेटाळलं.

Royal Enfield Interceptor Bear 650 unveiled price features and performance will launch soon in india
5 / 30

नाद करायचा नाय! Royal Enfield आणतेय ‘ही’ नवीकोरी बाईक, कमाल फिचर्स अन् दमदार परफॉरमन्स

ऑटो 18 hr ago

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल एनफिल्डने अखेर आपली नवीन मोटरसायकल Bear 650चे अनावरण केले आहे. पहिल्यांदाच या बाईकचे फोटो समोर आले आहेत, जे लवकरच इटलीच्या मिलान शहरात आयोजित EICMA मोटर शोमध्ये जगासमोर सादर केले जाणार आहेत. माहितीनुसार, कंपनी ५ नोव्हेंबरला होणाऱ्या मोटर शोमध्ये या नवीन बाईकच्या किमतीदेखील घोषित करू शकते. चला तर मग पाहूया कशी आहे रॉयल एनफिल्डची नवीन बेअर 650 मोटरसायकल.

madhuri dixit mumbai home inside photos
6 / 30

माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आहे खूपच सुंदर, पाहा Inside Video

माधुरी दीक्षितने १९९९ साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली होती. २०११ मध्ये ती पती व मुलांसह भारतात परतली. मुंबईतील तिचं आलिशान घर 'आर्किटेक्चरल डायजेस्ट इंडिया'ने दाखवलं आहे. माधुरीचं ५३ व्या मजल्यावरील घर खूपच सुंदर आहे.

Sonu Nigam keeps singing as he dodges man charging at him during live concert video viral
7 / 30

Video: लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सोनू निगमच्या समोर अचानक आला मद्यपी अन् मग…; पाहा व्हिडीओ

अनेक प्रसिद्ध गायकांचे सातत्याने लाइव्ह कॉन्सर्ट होत असतात. या कॉन्सर्टमध्ये बऱ्याच चांगल्या, वाईट घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका तरुणाने प्रेयसीला प्रपोज केलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सध्या असाच एक सोनू निगमच्या ( Sonu Nigam ) लाइव्ह कॉन्सर्टमधला व्हिडीओ व्हायरल होतं आहे.

shaina nc joins eknath shinde shivsena
8 / 30

भाजपा प्रवक्त्यांचा शिंदे गटात प्रवेश; प्रवेशाआधीच उमेदवारीही जाहीर; १२ तासांत सगळं घडलं!

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. शायना एनसी यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

jimi shergil career 50 flop movies
9 / 30

करिअरमध्ये तब्बल ५० चित्रपट झाले फ्लॉप, मात्र तरीही कोट्यवधी रुपये मानधन घेतो ‘हा’ अभिनेता

अभिनयाची कौटुंबीक पार्श्वभूमी नसतानाही जिमी शेरगिलने १९९६ मध्ये 'माचीस' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. 'मोहब्बतें' चित्रपटाने त्याला स्टारडम मिळवून दिले. त्याने 'मुन्ना भाई एमबीबीएस', 'तनु वेड्स मनु' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. जिमीने ५० फ्लॉप चित्रपट दिले असले तरी तो आजही कोटींमध्ये मानधन घेतो. त्याची एकूण संपत्ती ७६.१४ कोटी रुपये आहे.

Bigg Boss Marathi season 5 fame Vaibhav Chavan and irina Video viral
10 / 30

“लवकर लग्न करा”, वैभव चव्हाण-इरिनाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi Seaosn 5: ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेले स्पर्धक सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहेत. हे स्पर्धेक शोबाहेर आल्यापासून एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. अशातच वैभव चव्हाण आणि इरिना रुडाकोवालाच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं असून नेटकरी दोघांना लग्न करण्याचा सल्ला देत आहेत.

Hemansh Kohli to get married
11 / 30

बॉलीवूड अभिनेता ३५ व्या वर्षी करणार अरेंज मॅरेज, मंदिरात बांधणार लग्नगाठ

'यारियां' फेम बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहली ३५ व्या वर्षी अरेंज मॅरेज करणार आहे. दिल्लीतील एका खासगी समारंभात १२ नोव्हेंबर रोजी मंदिरात त्याचे लग्न होणार आहे. हिमांशची होणारी पत्नी सिनेसृष्टीतील नाही. हिमांशचे कुटुंबीय सध्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. हिमांशचे लग्नाचे कपडे डिझायनर कुणाल रावल डिझाईन करणार आहेत. हिमांश लवकरच 'बुंदी रायता' चित्रपटात दिसणार आहे.

Bigg Boss 18 Vivian Dsena and Karan Veer Mehra fight watch promo
12 / 30

Bigg Boss 18: अखेर विवियन डिसेना आणि करणवीर मेहरामध्ये पडली वादाची ठिणगी, पाहा प्रोमो

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या घरात दररोज वाद होणार नाहीत, हे तर अशक्यच आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सदस्यांमध्ये वाद होतं असतात. ‘बिग बॉस’चं १८वं पर्व सुरू झाल्यापासून विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा एकमेकांविरोधात खेळण्यासाठी बिग बॉसचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अखेर याला सुरुवात झाल्याचं समोर आलं आहे. विवियन आणि करणवीरमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. नुकताच याचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

saara kahi tichyasathi fame actor abhishek gaonkar will get marriage in November
13 / 30

पृथ्वीक प्रतापनंतर ‘हा’ लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख…

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचा २५ ऑक्टोबरला अत्यंत साध्या पद्धतीत लग्न समारंभ पार पडला. प्राजक्ता वायकुळ असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. २५ ऑक्टोबरला पृथ्वीकने अचानक लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. “एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने”, असं सुंदर कॅप्शन लिहून पृथ्वीकने लग्नाचे फोटो शेअर केले होते. पृथ्वीकनंतर आता आणखी एक लोकप्रिय मराठी अभिनेता लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलं आहे.

Priyanka Chopra daughter Malti says theek hoon video
14 / 30

Video:प्रियांका चोप्राच्या लेकीचं हिंदी ऐकलंत का? गोंडस मालतीने बाबाजवळ उच्चारला ‘तो’ शब्द

बॉलीवूड October 29, 2024

प्रियांका चोप्रा व निक जोनास यांची मुलगी मालती हिंदी बोलताना दिसल्याने चर्चेत आहे. प्रियांकाने इन्स्टाग्रामवर लंडनमधील काही फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यात मालती 'ठिक हूं' असे हिंदीत बोलते. चाहत्यांनी तिच्या गोड आवाजाची प्रशंसा केली आहे. प्रियांका नुकतीच भारतात आली होती आणि तिचा निर्मिती केलेला मराठी चित्रपट 'पाणी' १८ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला, परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही.

Bigg Boss 18 Rajat Dalal and Avinash Mishra between fight over Chahat Pandey
15 / 30

चाहत पांडेमुळे रजत दलाल आणि अविनाश मिश्रामध्ये जोरदार भांडण, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा आता चौथा आठवडा सुरू झाला आहे. हादेखील आठवडा वादाने सुरू झाला असून पहिल्याच दिवशी म्हणजे २८ ऑक्टोबरच्या भागात घरातील सदस्यांमध्ये ड्युटीवरून वाद झाले. ‘बिग बॉस’ने घरातील सदस्यांना सर्वात जास्त अस्ताव्यस्त असणारा सदस्य कोण आहे? असं विचारलं. तेव्हा विवियन डिसेनासह तीन जणांनी चाहत पांडे असल्याचं सांगितलं. त्यामुळे ‘बिग बॉस’ने चाहत पांडेला ड्युटी वाटपाचा अधिकार दिला. तसंच सदस्य नीट ड्युटी करतात की नाही? हेदेखील चाहतला पाहायचं होतं. पण, काहीजण रात्री उशीरा ड्युटी करत असल्यामुळे घरात वाद झाले.

Maharashtra CM Eknath Shinde Property Net Worth Income in Marathi
16 / 30

एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ, १३ कोटींवरून थेट ३७ कोटींपर्यंत पडली भर!

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या संपत्तीत तिप्पट वाढ झाली आहे. २०१९ मध्ये १३ कोटींची संपत्ती असलेल्या शिंदेंची संपत्ती आता ३७ कोटींवर पोहोचली आहे. त्यांच्या विरोधात केदार दिघे यांची उमेदवारी असून त्यांची संपत्ती १ कोटी २० लाख आहे. मनसेचे अमित ठाकरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांची संपत्ती १६ कोटी आहे.

devendra fadnavis marathi news
17 / 30

“महाराष्ट्रात आम्ही अतिआत्मविश्वासात होतो”, फडणवीसांनी केलं मान्य; ‘या’ दोन कारणांचा…

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या तीन आठवड्यांत मतदान होणार आहे. महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटप व उमेदवार जाहीर करण्याच्या घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीतील अपप्रचारामुळे महायुतीची पीछेहाट झाल्याचे सांगितले. त्यांनी "वोट जिहाद"चा उल्लेख करत, आगामी निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला.

November OTT Release List
18 / 30

नोव्हेंबर महिन्यात OTT वर येणार जबरदस्त चित्रपट अन् सीरिज; वाचा कलाकृतींची यादी

ओटीटी October 29, 2024

नोव्हेंबर महिन्यात ओटीटीवर अनेक गाजलेल्या सीरिज व चित्रपट येणार आहेत. 'किष्किंधा कांडम' १ नोव्हेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर, 'मिथ्या: द डार्कर चॅप्टर' झी 5 वर, 'सिटाडेल: हनी बनी' ७ नोव्हेंबरला प्राइम व्हिडीओवर, 'वेट्टैयन' ७ नोव्हेंबरला प्राइम व्हिडीओवर, 'विजय 69' ८ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर, 'इट एंड्स विथ अस' प्राइम व्हिडीओ आणि नेटफ्लिक्सवर, 'ये काली काली आंखें: सीझन 2' २२ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर, आणि 'द मॅडनेस' २८ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहेत.

Kerala Firecrackers Fire Breaking News
19 / 30

धक्कादायक! रचून ठेवलेल्या फटाक्यांना आग लागून १५० जण जखमी, ८ जणांची प्रकृती गंभीर

दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी केली जाते, परंतु फटाक्यांची योग्य काळजी न घेतल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. केरळच्या नीलेश्वरम भागातील वीरारकवू मंदिर महोत्सवात फटाक्यांच्या साठ्याला आग लागून १५० जण जखमी झाले, त्यापैकी ८ जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी केली असून, या दुर्घटनेचे कारण शोधण्याचा तपास सुरू आहे.

Arjun Kapoor Confirms Breakup With Malaika Arora
20 / 30

Video: ६ वर्षांचं नातं संपलं! मलायका अरारोचं नाव ऐकताच अर्जुन कपूर म्हणाला…

बॉलीवूड October 29, 2024

बॉलीवूडमधील चर्चित जोडपं मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचं ब्रेकअप झालं आहे. अर्जुनने एका कार्यक्रमात याची पुष्टी केली. २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या या जोडप्याने अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुनने 'सिंघम अगेन'च्या प्रमोशनदरम्यान तो सिंगल असल्याचं जाहीर केलं. 'सिंघम अगेन' चित्रपटात अर्जुन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Maharashtra assembly election 2024 Ajit Pawar NCP releases fourth list of 2 candidates
21 / 30

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने चौथी यादी जाहीर केली आहे, ज्यात दोन उमेदवारांची नावे आहेत. आतापर्यंत अजित पवारांनी ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपाने १४६ आणि शिंदे गटाने ८० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. अजित पवारांनी महायुतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे त्यांना किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Eknath Shinde Family
22 / 30

शिंदे सासू-सुना मुख्यमंत्र्यांच्या विजयासाठी कंबर कसून मैदानात!

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ ऑक्टोबर रोजी ठाण्यात शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल केला. त्यांच्या पत्नी लता शिंदे आणि सून वृषाली शिंदे प्रचाराला हजर होत्या. लता शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचं आवाहन केलं. वृषाली शिंदे यांनी सासू-सून नात्याऐवजी माय-लेकीसारखं नातं असल्याचं सांगितलं.

Maharashtra assembly election 2024 MNS releases Seventh list of 18 candidates
23 / 30

मनसेची सातवी यादी जाहीर, आतापर्यंत १२८ जणांना उमेदवारी; सर्व शिलेदारांची नावे एका क्लिकवर!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सातवी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात १८ जणांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत मनसेने १२८ उमेदवारांची घोषणा केली आहे, ज्यात अनेक हायवोल्टेज मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे आगामी विधानसभा २०२४ निवडणुकांमध्ये मनसे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Bigg Boss Marathi season 5 winner suraj Chavan speech at Ajit Pawar Baramati Sabha
24 / 30

“दादांना झापूक झुपूक होऊन मतदान करा”, अजित पवारांच्या बारामती सभेत सूरज चव्हाणचं भाषण

बारामती मतदारसंघातून आज ( २८ ऑक्टोबर ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी कण्हेरी येथून प्रचाराचा शुभारंभ झाला. जोरदार शक्तिप्रदर्शन करत अजित पवार यांनी अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणने खास उपस्थिती लावली होती. एवढंच नव्हे तर त्याने भाषण करत अजित पवारांना मतं देण्यासाठी जनतेला आवाहन केलं.

Salman Khan struggles with sleepless nights after Baba Siddique’s murder
25 / 30

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर ‘अशी’ आहे सलमान खानची अवस्था; झिशान सिद्दिकींचा खुलासा

बॉलीवूड October 28, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी बिश्नोई गँगने हत्या केली. त्यांच्या हत्येचा सलमान खानला मोठा धक्का बसला आहे. सिद्दिकी आणि सलमान खान सख्ख्या भावांसारखे होते. लॉरेन्स बिश्नोईच्या गँगने सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या खुनानंतर सलमान खान झोपू शकत नाहीये, असं झिशान सिद्दिकी यांनी सांगितलं.

Prasad Oak was on a liquid diet for 55 days for the film Dharmaveer
26 / 30

‘धर्मवीर’ चित्रपटासाठी प्रसाद ओक ‘इतके’ दिवस होता लिक्वीड डाएटवर, यामागचं कारण जाणून घ्या…

सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक प्रसाद ओक आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रसाद ओक लागोपाठ सुपरहिट चित्रपट देत आहे. अभिनयाबरोबर आपल्या दिग्दर्शनानेही प्रसादने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. अशा या लोकप्रिय अभिनेत्याने ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी ५०हून अधिक दिवसांसाठी लिक्वीड डाएट केलं होतं. याचा किस्सा अलीकडेच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सांगितला.

Nimrat Kaur Break Silence On Abhishek Bachchan Dating Rumors
27 / 30

“मी काहीही केलं तरी…”, अभिषेक बच्चनला डेट करण्याच्या चर्चांबाबत निम्रत कौरचे वक्तव्य

बॉलीवूड October 28, 2024

अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेकचं नाव निम्रत कौरशी जोडलं जात आहे. निम्रतने या अफवांवर प्रतिक्रिया देत, गॉसिप्स थांबत नाहीत, असं म्हटलं. 'दसवीं' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच्या व्हिडीओमुळे अफवा पसरल्या. अनंत अंबानीच्या लग्नात वेगळं येण्यामुळे चर्चांना उधाण आलं.

Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
28 / 30

“मी ब्राम्हण असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दलच्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला. ६ ऑक्टोबरला सूरज चव्हाणला विजेता घोषित करताच अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याचं अभिनंदन केलं होतं. तसंच अभिनेता अभिजीत केळकरनेदेखील सूरजबद्दल पोस्ट लिहून कौतुक केलं होतं. पण या पोस्टवरून अभिजीतला ट्रोल करण्यात आलं. त्याच ट्रोलिंगवर आता अभिजीतने भाष्य केलं आहे.

sujay vikhe patil controversial Statement
29 / 30

“आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य!

भाजपाने आतापर्यंत १२१ जागांची यादी जाहीर केली असून संगमनेर, नेवासा आणि श्रीरामपूरमधील जागा जाहीर व्हायच्या आहेत. संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध विखे असा वाद सुरू आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी जहाल भाषणात आचारसंहिता मोडण्याची भाषा केली. जयश्री थोरात आणि सुजय विखे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असून समर्थकांमध्येही तणाव आहे. सुजय विखे यांनी विरोधकांना धमकी दिली की, "टायगर अभी जिंदा है."

Vasubaras 2024 Easy rangoli for vasubaras easy cow rangoli for Diwali rangoli video
30 / 30

आकर्षक रांगोळी काढून साजरी करा वसुबारस; सोप्या पद्धतीने काढा गोमुख आणि वासरू, पाहा VIDEO

आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. आज २८ ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. गाईची सेवा केली जाते. गाईला आईचं स्थान दिलं जातं. दिवाळीची खरी सुरुवात गाईची पूजा करून, म्हणजेच वसुबारस या सणापासून होते. आज वसुबारस या खास दिनानिमित्त आपण सोप्या पद्धतीनं आकर्षक रांगोळी कशी काढावी ते जाणून घेणार आहोत.