Bigg Boss 18 Digvijay Singh Rathee and Kashish Kapoor to enter in salman khan show
1 / 30

दिवाळीच्या मुहूर्तावर ‘बिग बॉस १८’च्या घरात धमाका! दोन दमदार वाइल्ड कार्डची होणार एन्ट्री

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचे दिवस जसजसे पुढे जात आहेत तसे घरातील समीकरण बदलताना दिसत आहेत. घरात दोन गट आहेत. पण काही सदस्य या दोन्ही गटातून खेळताना दिसत आहेत. तर काही सदस्य ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहेत. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर ‘बिग बॉस’च्या घरात मोठा धमाका होणार आहे. दोन दमदार वाइल्ड कार्डची एन्ट्री होणार असल्याचं समोर आलं आहे. तसंच एका वाइल्ड कार्ड सदस्याचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Swipe up for next shorts
Bigg boss 18 Shehzada Dhami is Evicted from salman khan show
2 / 30

Bigg Boss 18: चौथ्या आठवड्यात ‘हा’ सदस्य झाला एलिमिनेट, ‘हे’ सहा सदस्य झाले सुरक्षित

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या चौथा आठवडा सुरू आहे. आतापर्यंत ‘बिग बॉस १८’च्या घरातून चार सदस्य घराबाहेर झाले आहेत. आता बेघर होणाऱ्या पाचव्या सदस्याचं नाव देखील समोर आलं आहे. तसंच शिल्पा शिरोडकरसह नॉमिनेट झालेले सहा सदस्य सुरक्षित झाले आहेत.

Swipe up for next shorts
Bibek Debroy
3 / 30

Bibek Debroy : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे निधन

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व पंतप्रधानांचे माजी आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ६९ होते. पद्मश्री सन्मानित देबरॉय यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली होती. सप्टेंबरमध्ये त्यांनी गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या कुलपतीपदाचा राजीनामा दिला होता. सविस्तर वृत्त लवकरच…

Swipe up for next shorts
Ajit Pawar Baramati Vidhansabha
4 / 30

“बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं…”, अजित पवारांचं विधान चर्चेत!

बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात हायवोल्टेज लढत आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला होता. अजित पवारांनी मतदारांना चांगल्या मताधिक्याने संधी देण्याचे आवाहन केले आहे. शरद पवार आणि अजित पवार दोघेही बारामतीत सभा घेत आहेत. त्यामुळे दिवाळीत राजकीय वातावरण तापणार आहे.

Somnath Awaghade shares romantic photo with Rajeshwari Kharat
5 / 30

शालू-जब्याचं चाललंय का? राजेश्वरीने हळदीचा फोटो शेअर केल्यावर सोमनाथची पोस्ट चर्चेत

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फँड्री' चित्रपटातील जब्या (सोमनाथ अवघडे) आणि शालू (राजेश्वरी खरात) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. राजेश्वरीने सोमनाथबरोबर हळदीचा फोटो शेअर केल्याने चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. सोमनाथनेही एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. दोघांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांना जोर आला आहे, मात्र त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Donald Trump Diwali Wishes
6 / 30

“मोदी आमचे चांगले मित्र, हिंदूंचं संरक्षण करू”, ट्रम्प यांच्याकडू दिवाळीच्या शुभेच्छा

अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत भारतीयांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी भारत-अमेरिका भागीदारी मजबूत करण्याचे आश्वासन दिले आणि हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराचा निषेध केला. ट्रम्प यांनी कमला हॅरिस आणि जो बायडन यांच्यावर टीका केली आणि अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचे वचन दिले. ५ नोव्हेंबर रोजी निवडणुकीत कोण विजयी होणार याची उत्सुकता आहे.

Aishwarya Rai Bachchan follows only one person on instagram
7 / 30

ऐश्वर्या राय बच्चन इन्स्टाग्रामवर फक्त ‘या’ एकाच व्यक्तीला करते फॉलो

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ऐश्वर्या व अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या अफवा पसरत आहेत, परंतु दोघांनीही यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. घटस्फोटाच्या बातम्या येत असल्या तरी १४.३ मिलियन फॉलोअर्स असलेली ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर फक्त पती अभिषेकला फॉलो करते.

Amy Jackson Announces Pregnancy
8 / 30

अफेअरमधून मुलाचा जन्म, दोन महिन्यांपूर्वी लग्न करणारी बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई

अ‍ॅमी जॅक्सनने ब्रिटिश अभिनेता एडवर्ड वेस्टविकशी दोन महिन्यांपूर्वी लग्न केले आणि आता ती आई होणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर बेबी बंपसह फोटो शेअर केले आहेत. अ‍ॅमी व एडवर्डने इटलीतील अमाल्फी बीचवर ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले होते. अ‍ॅमीचा पाच वर्षांचा मुलगा अँड्रियासही या लग्नात सहभागी झाला होता. अ‍ॅमी व एडवर्ड २०२२ पासून एकमेकांना डेट करत होते.

Star Pravah popular serial aai kuthe kay karte will off air Milind gawali share post
9 / 30

ठरलं! ‘आई कुठे काय करते’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा घेणार निरोप

'स्टार प्रवाह'वरील 'आई कुठे काय करते' मालिका डिसेंबर २०१९मध्ये सुरू झाली होती आणि आता ती लवकरच संपणार आहे. मालिकेने साडे चार वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मालिकेच्या बंद होण्याच्या चर्चा होत्या, आणि आता हे निश्चित झालं आहे. मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे मालिकेचा निरोप घेणार असल्याचं सांगितलं आहे.

Devendra Fadnavis on Raj Thackeray
10 / 30

राज ठाकरेंना महायुतीत घेणार का? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपाबरोबर युती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी महायुतीबरोबर जाण्याचा पर्याय निवडू असे म्हटल्याने चर्चांना जोर आला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मनसेने अनेक जागांवर उमेदवार उभे केले आहेत आणि ते महायुतीत सामील होण्याची शक्यता नाही. फडणवीस यांनी सांगितले की, महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर लहान पक्ष आहेत.

Bigg Boss 18 avinash Mishra isha singh and karan veer Mehra chum darang romantic dance
11 / 30

Bigg Boss 18: अविनाश-ईशा आणि करण-चुमने रोमँटिक गाण्यावर केला जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

Bigg Boss 18: ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वात नुकताच ‘टाइम गॉड’चा टास्क पार पडला आणि विवियन डिसेना ‘टाइम गॉड’ झाला. यानंतर एक मजेशीर टास्क झाला आहे. ज्यामध्ये अविनाश मिश्रा-ईशा सिंह आणि करणवीर मेहरा-चुम दरांग या दोन जोड्यांनी जबरदस्त डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

Bigg Boss 18 Vivian Dsena new time god Argument with Shrutika arjun for cleaning
12 / 30

Bigg Boss 18: ‘टाइम गॉड’ होताच विवियन डिसेनाचं बदललं रुप, श्रुतिका अर्जुनशी झाले वाद

Bigg Boss 18: हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वातला दुसरा कॅप्टन म्हणजेच ‘टाइम गॉड’ विवियन डिसेना झाला आहे. यासाठी ‘बिग बॉस’ने एक टास्क दिला होता. करणवीर मेहरा आणि विवियन डिसेनामध्ये या दोघांमध्ये टास्क रंगला. यावेळी घरातील सर्व सदस्यांच्या सहमतीने विवियन डिसेनाला ‘टाइम गॉड’ करण्यात आलं. पण, ‘टाइम गॉड’ होताना विवियन डिसेनाचं रुप बदलेलं दिसत आहे. नुकताच एक प्रोमो समोर आला आहे; ज्यामध्ये विवियन श्रुतिका अर्जुनला साफसफाई नीट न केल्यामुळे टोकताना दिसत आहे.

Belly fats how to burn belly fat using 5 20 30 method know from expert
13 / 30

Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा

Belly Fats: बेली फॅट्स (पोटाची चरबी) कमी करण्यासाठी आज आपण ५-२०-३० या पद्धतीची ओळख करून घेणार आहोत. “या पद्धतीमध्ये आठवड्यातून पाच दिवस २० मिनिटे वजन उचलणे आणि ३० मिनिटे चालणे याचा समावेश आहे. जर तुम्ही चांगल्या जेवणाबरोबर हे सातत्याने केले तर तुमचे बेली फॅट्स कमी होतील,” असे फॅट लॉसतज्ज्ञ जॉन विल्यम्स म्हणाले.

Netizens Trolled Marathi actress Prajakta Mali, know
14 / 30

“फरसाण खायचं बंद कर”, ऑरा जपण्यासाठी प्राजक्ता माळी काय करते ऐकून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'फुलवंती' चित्रपटानिमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळी विविध ठिकाणी मुलाखती देताना पाहायला मिळत आहे. एका मुलाखतीमध्ये तिने ऑरा जपण्यासाठी काय करते? याविषयी सांगितलं होतं. त्यावरून नेटकरी प्राजक्ता माळीला ट्रोल करत आहेत.

D

D

Prakash Ambedkar Health Update
15 / 30

वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची प्रकृती बिघडली, छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल!

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ३१ ऑक्टोबरला पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून ही माहिती दिली. पुढील काही दिवस आंबेडकर डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार असून, रेखा ताई ठाकूर प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

donald trump tagged trendulkar
16 / 30

“भाई, मैं गोरेगाव में रहता हूँ”, मुंबईकराचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला प्रतिसाद!

भारतात लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची चर्चा आहे. जागतिक पटलावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्यात थेट सामना होणार आहे. ट्रम्प सोशल मीडियावर मतदारांना आवाहन करत आहेत, परंतु त्यांनी चुकून भारतीय अकाऊंट Trendulkar ला टॅग केल्याने ट्रोल झाले. या व्यक्तीने "भाई, मैं गोरेगाव में रेहता हूँ" अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे ट्रम्प यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

Devendra Fadnavis on Rebelian
17 / 30

“उमेदवारी दिलेली नसताना ज्यांनी अर्ज भरलाय…”, बंडखोरांसाठी फडणवीसांचं मोठं विधान!

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीत उमेदवारीवरून नाराजी आहे. अनेक निष्ठावान नेत्यांना संधी न मिळाल्याने बंडखोरी झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, बंडखोरांना परत घेण्यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करतील. रवी राजा भाजपात दाखल झाले. फडणवीसांनी प्रचाराची तयारी पूर्ण असल्याचे सांगितले. गोपाळ शेट्टींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Diwali 2024 gold silver price drop in india
18 / 30

दिवाळीच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Diwali 2024 Gold Silver Rate Today : दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आज सोन्याच्या दरात आज किंचित घसरण झाली आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात १३० रुपयांची घसरण झाली आहे. इतकच नाही तर चांदीचा दरही ६७० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर सोने- चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घ्या.

Bigg Boss Marathi Fame Abhijeet Sawant and her wife met yogita Chavan Nikhil damle
19 / 30

‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणच्या घरी पोहोचला अभिजीत सावंत, पाहा फोटो

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा उपविजेता अभिजीत सावंतने नुकतीच योगिता चव्हाणची भेट घेतली. अभिजीत पत्नी शिल्पा सावंतसह योगिताच्या घरी गेला होता. या खास भेटीचे फोटो शिल्पा सावंतसह योगिताचा पती सौरभ चौघुलेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Marathi Actor Siddharth Chandekar share post for diwali wish of fans
20 / 30

“नकोच तो अंधार…”, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने अनोख्या अंदाजात दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

दिवाळीचा सण दरवर्षी प्रकाशमय आणि उत्साहाचं वातावरण घेऊन येतो. प्रत्येकाच्या जीवनात आनंद, नवचैतन्य घेऊन येणारा हा सण आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दिवाळी मानला जातो. आजपासून संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. यंदा अमावस्या दोन दिवस असल्यामुळे पाच दिवसांचा दिवाळी सण सहा दिवसांचा होतं आहे. दिवाळीनिमित्ताने सध्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. कलाकार मंडळीदेखील चाहत्यांना शुभेच्छा देत आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने आपल्या अनोख्या अंदाजात दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Amit Thackeray on Eknath Shinde
21 / 30

“धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

२०२१ मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह भाजपाला समर्थन दिलं. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. शिवसेनेतील बंडखोरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आणि एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्षचिन्ह मिळालं. अमित ठाकरे यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

India-Canada Conflict United States reacts
22 / 30

खलिस्तानी अतिरेक्यांच्या हत्येमागे अमित शाह? कॅनडाच्या आरोपाची अमेरिकेकडून दखल

कॅनडाच्या मंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कॅनडातील कथित हिंसक कारवायांचे संचालन केल्याचा आरोप केला आहे. कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेथाली ड्रौइन यांनी ही माहिती अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ला दिली आहे. अमेरिकेनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया देत कॅनडाचे आरोप गंभीर असल्याचे म्हटले आहे. भारताने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून, त्यांना खोटे आणि बिनबुडाचे म्हटले आहे.

train hits student sitting on track with headphones
23 / 30

हेडफोन आणि मोबाइल ठरलं मृत्यूचं कारण; रेल्वे ट्रॅकवर बसलेला विद्यार्थी ट्रेनखाली चिरडला

हेडफोन आणि मोबाइलचा अतिवापर विद्यार्थ्यांसाठी घातक ठरत आहे. भोपाळमध्ये २० वर्षीय विद्यार्थी मानराज तोमर रेल्वे रुळावर मोबाइलवर व्हिडीओ पाहताना ट्रेनखाली चिरडला गेला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हेडफोनमुळे ट्रेनचा आवाज ऐकू आला नाही. मानराज बीबीएचा विद्यार्थी होता आणि त्याला बॉडी बिल्डिंग व रिल बनविण्याचा छंद होता.

what happens to blood sugar levels when you walk after a meal
24 / 30

जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा….

हेल्थ October 31, 2024

चालणे हा आरोग्यासाठी अत्यंत प्रभावी व्यायाम आहे सांगितले जाते, पण जेवणानंतर तुम्ही चालता तेव्हा तुमच्या रक्तातील साखरेवर नेमका काय परिणाम होतो हे माहित्येय का? मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ. जिनेंद्र जैन यांनी सांगितले की, "जेवणानंतर चालणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात मदत करू शकते."

MNS Raj Thackeray ladki Bahin Yojana
25 / 30

“फुकट पैसे देऊन महिलांना लाचार बनवताय”, लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंची महायुतीवर टीका!

महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजना महिलांसाठी अंमलात आणली. ४ कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला असून ४६ हजार कोटींची तरतूद आहे. आचारसंहिता लागल्याने निधी थांबवला आहे. राज ठाकरे यांनी टीका करताना महिलांना फुकट गोष्टी देण्याऐवजी सक्षम बनवण्याची गरज व्यक्त केली. फुकट योजना महाराष्ट्राला दिवाळखोरीकडे नेऊ शकतात, असेही ते म्हणाले.

raj thackeray on amit thackeray (1)
26 / 30

अमित ठाकरेंनी निवडणूक लढवायचं ठरवलं, तेव्हा राज ठाकरे व शर्मिला ठाकरेंनी काय सांगितलं?

मुंबई October 31, 2024

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राज ठाकरे यांनी सांगितले की, अमितने पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. राज ठाकरे म्हणाले की, त्यांनी कधीही गोष्टी लादल्या नाहीत आणि अमितला निवडणूक लढवण्याची मुभा दिली. अमितच्या उमेदवारीवर राज ठाकरेंनी भाष्य करताना विरोधी उमेदवारांबाबतही विचार मांडले.

Supriya Sule and Aaditya Thackeray
27 / 30

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनणार का? आदित्य ठाकरे म्हणाले…

महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्र्याबाबत चर्चा सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी एबीपी न्यूजच्या शिखर संमेलनात सांगितले की, महिला मुख्यमंत्री होण्याबाबत जनता ठरवेल. महाविकास आघाडी सरकारवर अनेकांचा विश्वास आहे, विशेषतः उद्धव ठाकरेंवर.

Sukesh Chandrashekhar and Jacqueline Fernandez
28 / 30

“आपली प्रेमकथा रामायणाच्या तोडीची”, जॅकलीन फर्नांडीसला सुकेश चंद्रशेखरचं तुरुंगातून पत्र

मनोरंजन October 31, 2024

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या ठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहून त्यांच्या प्रेमकथेची तुलना रामायणाशी केली आहे. सुकेशने जॅकलिनच्या २०० चाहत्यांना महिंद्रा थार रॉक्स कार आणि आयफोन १६ प्रो भेट देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने जॅकलिनला ५२ लाखांचा घोडा आणि ९ लाखांची पर्शियन मांजर भेट दिली होती. सुकेशवर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

lawrence bishnoi interview
29 / 30

पोलीस स्टेशन नव्हे, लॉरेन्स बिश्नोईचा स्टुडिओ? उच्च न्यायालयानं पोलिसांना घेतलं फैलावर!

पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने पंजाब पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई प्रकरणात फटकारले आहे. न्यायालयाने पोलिसांच्या स्थानकामध्ये बिश्नोईची मुलाखत झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि पोलीस व बिश्नोई गँग यांच्यातील संबंध तपासण्यासाठी नवीन एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने तुरुंगातील कैद्यांना मिळणाऱ्या सुविधांवरही प्रश्न उपस्थित केले. मार्च २०२३ मध्ये बिश्नोईची मुलाखत पोलिसांच्या ताब्यात असताना झाली होती.

Ajit Pawar on Sharad Pawar Mimicry
30 / 30

शरद पवारांनी नक्कल केल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

विधानसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवार आणि त्यांचे पुतणे युगेंद्र पवार आमने-सामने आले आहेत. शरद पवारांनी प्रचारसभेत अजित पवारांची नक्कल केली, ज्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी शरद पवारांच्या नकलेबद्दल नाराजी व्यक्त केली आणि भावनिक क्षणांची आठवण करून दिली. अजित पवारांनी शरद पवारांना दैवत मानल्याचे सांगून नकलेमुळे मनाला वेदना झाल्याचे म्हटले.