दीड लाखांचा हिरेजडीत सूट घालून गुणरत्न सदावर्तेंचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
हिंदी ‘बिग बॉस’च्या १८व्या पर्वाचा सध्या पहिल्याच आठवडा सुरू आहे. हे पर्व सुरू होऊन चार दिवस उलटले आहेत. पण घरातील १८ सदस्यांनी पहिल्या दिवसापासून चांगलंच गाजवलं आहे. या १८ सदस्यांमधून सगळ्यात चर्चेत असलेले सदस्य म्हणजे अॅड. गुणरत्न सदावर्ते. . चौथ्या दिवशी गुणरत्न सदावर्तेंचा हटके अंदाज पाहायला मिळाला.