करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ
'बिग बॉस १८' चा विजेता करण वीर मेहरा चर्चेत आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीने, निधी सेठने, बंगळुरूच्या मंदिरात साधेपणाने लग्न केले आहे. निधीने गुलाबी बनारसी साडी आणि सोन्याचे दागिने घातले होते, तर तिच्या पतीने निळा फ्लोरल कुर्ता पायजमा घातला होता. सोशल मीडियावर फोटो शेअर करत निधीने तिच्या नवऱ्याचे आभार मानले आणि त्यांच्या नात्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.