निक्कीला मारणाऱ्या आर्याला ‘बिग बॉस’च्या दुसऱ्या पर्वातील सदस्याने दिला सल्ला, म्हणाला…
'बिग बॉस मराठी 5'च्या सातव्या आठवड्यात 'जादुई हिरा' कॅप्टन्सी टास्कमध्ये आर्या आणि निक्कीमध्ये वाद झाला. झटापटीत आर्याने निक्कीला कानशिलात लगावली. अभिजीत केळकरने संयम आणि मानसिक संतुलनाचे महत्त्व सांगत आर्याला माफी मागण्याचा सल्ला दिला. बिग बॉसने आर्याला जेलमध्ये टाकले असून, अंतिम निर्णय रितेश देशमुख घेणार आहे.