‘बिग बॉस मराठी’नंतर मोठ्या पडद्यावर झळकणार निक्की तांबोळी; ‘या’ इंडस्ट्रीत करतेय पदार्पण
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात चर्चेत राहिलेली निक्की तांबोळी लवकरच पंजाबी चित्रपट 'बदनाम'मध्ये आयटम साँग करताना दिसणार आहे. हा चित्रपट फेब्रुवारी २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. निक्कीने मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली होती आणि तेलुगू, तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे लाखो चाहते आहेत. सध्या ती बिग बॉस मराठी फेम अरबाज पटेलला डेट करत आहे.