Video: ‘तो’ प्रश्न अन् निक्कीचा चेहरा पडला, बिग बॉसच्या घरात झाली पत्रकार परिषद
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाची चर्चा सर्वत्र आहे. प्रेक्षकांची पसंती मिळालेल्या या शोमध्ये अरबाज पटेल दुसऱ्यांदा कॅप्टन झाला आहे, तर वर्षा उसगांवकरांनी बी टीम सोडली आहे. आजच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांना मराठी पत्रकार प्रश्न विचारणार आहेत. प्रोमोमध्ये स्पर्धकांना थेट प्रश्न विचारले जात आहेत, ज्याची उत्तरं आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळतील.