Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखलं जातं. सध्या हे ‘बिग बॉस’ हिंदीतच नाही तर विविध भाषांमध्ये पाहायला मिळत आहे. दोन महिन्यांपूर्वी ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व पार पडलं. हे पर्व चांगलंच गाजलं. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील स्पर्धक सध्या नेहमी चर्चेत असतात. त्यांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं असतात. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या चौथा पर्वाचा विजेता लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलं आहे.