लग्नाआधी अंकिता वालावलकर भेटली योगिता चव्हाणला; फोटो पाहून डीपी दादाची प्रतिक्रिया
‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व चांगलंच गाजलं. त्यामुळे या पर्वातील सर्व सदस्य नेहमी चर्चेत असतात. लवकरच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली अंकिता वालावलकर लग्नबंधनात अडकणार आहे. संगीतकार कुणाल भगतबरोबर अंकिताच लग्न होणार आहे. त्यामुळे सध्या दोघं लग्नाची जोरदार तयारी करताना दिसत आहेत. लग्नाआधी अंकिता-कुणालने योगिता चव्हाण आणि तिच्या नवऱ्याची भेट घेतली. याचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.