जान्हवी किल्लेकर लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस, ‘या’ लोकप्रिय मालिकेत झळकणार
‘बिग बॉस मराठी’चं पाचव्या पर्व गाजवणारी ‘किल्लर गर्ल’, ‘टास्क क्वीन’ अर्थात जान्हवी किल्लेकर सध्या खूप चर्चेत असते. ‘बिग बॉस मराठी’ संपल्यापासून जान्हवी ठिकठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात, तसंच नव्या चित्रपटाच्या प्रिमियर सोहळ्यात दिसते. अलीकडेच जान्हवी घनःश्याम दरवडेच्या वाढदिवसानिमित्ताने आपल्या कुटुंबासह त्याच्या गावी शुभेच्छा देण्यासाठी गेली होती. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. त्यानंतर आता जान्हवी किल्लेकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.