योगिता चव्हाण पतीबरोबर ‘या’ देशात लग्नाचा पहिला वाढदिवस करतेय साजरा, पाहा फोटो
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे ‘जीव माझा गुंतला’. या मालिकेतील अंतरा व मल्हाराच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. अभिनेत्री योगिता चव्हाणने अंतरा आणि अभिनेता सौरभ चौघुलने मल्हारची भूमिका साकारली होती. ‘जीव माझा गुंतला’ मालिका संपल्यानंतर काही महिन्यांनी अंतरा व मल्हार म्हणजेच योगिता व सौरभ आयुष्यभराचे जोडीदार झाले. ३ मार्चला योगिता व सौरभचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. आज दोघांच्या लग्नाला एक वर्षपूर्ण झालं आहे. यानिमित्ताने दोघं विदेशात फिरायला गेले आहेत.