मोहम्मद सिराज अन् ‘त्या’ अभिनेत्रीने डेटिंगच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं, म्हणाले…
'बिग बॉस 13' फेम माहिरा शर्मा आणि क्रिकेटर मोहम्मद सिराज यांच्या डेटिंगच्या अफवा मागील काही महिन्यांपासून सुरू होत्या. मात्र, माहिरा आणि सिराज दोघांनीही या अफवांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. माहिराने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून स्पष्ट केलं की ती कोणालाही डेट करत नाहीये. सिराजनेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या बातम्या निराधार असल्याचं सांगितलं. दोघांनीही पापाराझींना अफवा पसरवणं थांबवण्याचं आवाहन केलं आहे.