उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणचं कौतुक
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा ग्रँड फिनाले मोठ्या जल्लोषात पार पडला. बारामतीजवळच्या मोढवे गावातील सूरज चव्हाण विजेता ठरला. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांनी त्याचं कौतुक केलं. अजित पवारांनी सूरजच्या संघर्षाचा उल्लेख करत त्याला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सूरजने जिंकलेल्या रकमेचा वापर घर बांधण्यासाठी करणार असल्याचं सांगितलं.