‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ सोडताना दीपिका कक्कर झाली भावुक, म्हणाली…
Celebrity MasterChef : ‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. या कार्यक्रमातील नवनवीन हटके टास्क प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यामुळे कार्यक्रमाची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे. पण, आता ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ला दीपिका कक्करने ( Dipika Kakkar ) रामराम केला आहे. तिच्या एक्झिटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.