चार वर्षांनी टेलिव्हिजनवर कमबॅक करणाऱ्या ‘या’ स्पर्धकाची ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून EXIT
‘सोनी टेलिव्हिजन’ वाहिनीवरील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढताना दिसत आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांनी वेगवेगळे पदार्थ बनवून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वी ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून ९०च्या दशकातील बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आयेशा झुलकाची एन्ट्री झाली. त्यानंतर अभिजीत सावंत एविक्ट झाला. आता एका स्पर्धकाने अचानक ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रमाला रामराम केल्याचं समोर आलं आहे. याबाबत उषा नाडकर्णी यांनी स्वतः सांगितलं आहे.