दीपिका कक्कर-शोएब इब्राहिम घटस्फोट घेणार? म्हणाला, “तिने माझी फसवणूक केली…”
टीव्हीवरील लोकप्रिय जोडपं अमन वर्मा व वंदना लालवानी यांचा घटस्फोट झाल्याच्या बातमीनंतर दीपिका कक्कर व शोएब इब्राहिम यांच्या विभक्त होण्याच्या अफवा पसरल्या. शोएबने या अफवांवर हसत प्रतिक्रिया दिली आणि दीपिकाने फसवणूक केल्याचं विनोदात म्हटलं. दोघांनी या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. 'ससुराल सिमर का'च्या सेटवर प्रेमात पडलेल्या या जोडप्याने २०१८ साली लग्न केलं आणि २०२३ मध्ये मुलाचे आई-वडील झाले.