प्रसिद्ध अभिनेत्याचा २४ वर्षांचा संसार मोडला, ८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी केलेलं लग्न
टीव्ही अभिनेता पंकित ठक्कर, ज्याने 'दिल मिल गये' आणि 'कभी सौतन कभी सहेली' यांसारख्या मालिकांमध्ये काम केले, सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पंकित आणि त्याची पत्नी प्राची २४ वर्षांच्या लग्नानंतर कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. त्यांनी २०१६ मध्ये विभक्त होण्याची घोषणा केली होती, पण आता त्यांचा घटस्फोट अधिकृत झाला आहे. पंकितने या घटस्फोटावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. दोघांना एक मुलगा आहे जो प्राचीजवळ राहतो.