तृतीयपंथी मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो केले शेअर
मराठी अभिनेत्री प्रणित हाटेने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. तृतीयपंथी अभिनेत्री प्रणितने १ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्नगाठ बांधली. तिने लाल साडी आणि साधा मेकअप केला होता, तर तिच्या पतीने पांढरा कुर्ता-पायजामा आणि लाल जॅकेट घातले होते. प्रणितने झी मराठीच्या 'कारभारी लयभारी' मालिकेतून पदार्पण केले होते. तिच्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.