Video: गौतमी पाटीलने अभिनेते अरुण कदम यांचे घेतले आशीर्वाद, नेटकऱ्यांनी केलं कौतुक
गौतमी पाटील आणि अरुण कदम यांची नुकतीच एका कार्यक्रमात भेट झाली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातील अरुण कदम यांना भेटून गौतमीने त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. या भेटीचा व्हिडीओ गौतमीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी गौतमीच्या संस्कारांचे कौतुक केले आहे.