Gharoghari Matichya Chuli fame Reshma shinde and rutuja kulkarni on o pilaga venkati song
1 / 30

Video: ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकीचा जाऊबाईबरोबर दाक्षिणात्य लोकगीतावर भन्नाट डान्स

सोशल मीडियावर नेहमी विविध भाषांमधील गाणी ट्रेंड होतं असतात. त्यामुळे युजरसह कलाकार मंडळी ट्रेंडिंग गाण्यावर रील करत असतात. त्यानंतर ही गाणी अधिक हिट होतात. गेल्या काही महिन्यांपासून ‘ओ पिलगा व्यंकटी’ नावाच तेलुगू लोकगीत खूप ट्रेंड होतं आहे. या गाण्यातील हूकस्टेपने सगळ्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. याच ट्रेंड होतं असलेल्या तेलुगू लोकगीतावर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील जानकी म्हणजे अभिनेत्री रेश्मा शिंदेने जाऊबाई अवंतिकाबरोबर म्हणजेच अभिनेत्री ऋतुजा कुलकर्णीबरोबर भन्नाट डान्स केला आहे.

Swipe up for next shorts
Rahul Rai success story Gamma Point Capital founder Rahul rai career in crypto currency now working at BlockTower Capital
2 / 30

पाच महिन्यांत कमावले २८६ कोटी, आयआयटी सोडून धरली ही वाट; वाचा राहुल रायच्या यशाचं सीक्रेट

यश कधीच सहजासहजी मिळत नाही. आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिल्यानंतर यशाचा सुखद अनुभव घेता येतो. त्यात शिक्षणाचा वाटादेखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. जितकं चांगलं शिक्षण तितका करिअरसाठी चांगला वाव, असं म्हणतात. पण एका आयआयटी ड्रॉपआउटनं ते सहज शक्य करून दाखवलंय. अखंड मेहनत आणि धाडसी निर्णयामुळे राहुल राय यानं अवघ्या पाच महिन्यांत २८६ कोटी कमावून दाखवले आहेत. चला तर मग जाणून घेऊ राहुल रायचा प्रेरणादायी प्रवास…

Swipe up for next shorts
Sanjay Raut on Anil Deshmukh attack
3 / 30

“आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना…”, संजय राऊतांना संशय

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. राऊतांनी भाजपाच्या काळात कायदा सुव्यवस्थेची स्थिती खराब असल्याचा आरोप केला. देशमुखांचे पूत्र सलील काटोल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, आणि प्रचारादरम्यान ही घटना घडली.

Swipe up for next shorts
Bigg Boss 18 karan veer Mehra Vivian dsena avinash Mishra chahat pandey digvijay rathee kashish Kapoor nominated
4 / 30

Bigg Boss 18: सातव्या आठवड्यात ‘हे’ सात सदस्य झाले नॉमिनेट

बिग बॉसच्या १८व्या पर्वात १६ दिवसांपूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर दोन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री झाली. त्यानंतर आता एक-दोन नव्हे तर आणखी तीन वाइल्ड कार्ड सदस्यांनी एन्ट्री झाली आहे. अदिती मिस्त्री, एडिन राज, यामिनी मल्होत्रा या तिघीजणी वाइल्ड कार्ड म्हणून ‘बिग बॉस १८’मध्ये सहभागी झाल्या आहेत. याआधी ‘बिग बॉस’च्या सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क पार पडला. यामध्ये नेमकं काय घडलं? कोण सात सदस्य घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले? जाणून घ्या…

Keerthy Suresh to marry longtime boyfriend Antony Thattil
5 / 30

१५ वर्षांपासून दुबईच्या बिझनेसमनबरोबर रिलेशनशिपमध्ये असलेली अभिनेत्री गोव्यात करणार लग्न

दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश लवकरच तिच्या बॉयफ्रेंड अँटनी थट्टिलशी लग्न करणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. अँटनी दुबईत राहतो आणि दोघे १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. कीर्तीने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आणि 'महानती' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. ती वरुण धवनसोबत 'बेबी जॉन' चित्रपटात दिसणार आहे, जो २५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होईल.

Dilip Joshi reacts on his fight with Asit Modi
6 / 30

‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांशी भांडणाच्या वृत्तांवर दिलीप जोशींनी सोडलं मौन; म्हणाले…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे मुख्य कलाकार दिलीप जोशी आणि निर्माते असित मोदी यांच्यात भांडण झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, सेटवर दिलीप जोशी यांनी असित मोदींची कॉलर धरली होती. मात्र, दिलीप जोशी यांनी या अफवा फेटाळल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, अशा खोट्या बातम्यांमुळे त्यांना आणि प्रेक्षकांना त्रास होतो. दिलीप जोशी यांनी शो सोडण्याच्या अफवाही खोट्या असल्याचे सांगितले.

Mandar Chandwadkar denies fight between Dilip Joshi Asit Modi
7 / 30

दिलीप जोशी-असित मोदी यांच्या भांडणाच्या वृत्ताबद्दल मंदार चांदवडकर म्हणाला…

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या सेटवर अभिनेते दिलीप जोशी आणि निर्माते असित मोदी यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दिलीप यांनी असित यांची कॉलर धरल्याचं वृत्त होतं. मात्र, मंदार चांदवडकर आणि अमित भट्ट यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. त्यांनी सांगितलं की, सेटवर सर्वजण शांततेत आणि आनंदाने शूटिंग करत आहेत, आणि या अफवा आहेत.

Arti Singh on Kashmera Shah accident
8 / 30

कश्मीरा शाहचा अपघात कसा झाला? तिची नणंद आरती सिंहने दिली माहिती

अभिनेत्री कश्मीरा शाहचा अमेरिकेत अपघात झाला आहे. इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या टिश्यूंचा फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली. तिच्या नणंद आरती सिंहने सांगितले की, कश्मीरा एका मॉलमध्ये काचेला धडकली आणि तिच्या नाकाला जखम झाली. खूप रक्तस्त्राव झाला, पण ती आता बरी आहे. कश्मीरा, तिचा पती कृष्णा अभिषेक आणि मुलं लॉस एंजेलिसला सुट्टीसाठी गेले होते.

Kasthuri Shankar sent to jail after her anti Telugu remarks
9 / 30

अभिनेत्री कस्तुरीला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी, ‘ते’ वक्तव्य पडलं महागात

दाक्षिणात्य अभिनेत्री कस्तुरी शंकर तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने तेलुगू भाषिक लोकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती, ज्यामुळे तिला अटक करण्यात आली. चेन्नई पोलिसांनी तिला हैदराबादमधून अटक करून चेन्नई न्यायालयात हजर केले. तिला २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कस्तुरीने माफी मागितली असली तरी तिच्याविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या होत्या.

Avoid Road challan while driving your car with google maps trick
10 / 30

गुगल मॅप्सच्या या ट्रिकने तुम्हाला कधीच चलन भरावे लागणार नाही, जाणून घ्या हा जुगाडू हॅक

ऑटो 19 hr ago

जर तुम्ही तुमच्या कारमधून रोज कामासाठी किंवा अन्य ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करत असाल आणि कधीतरी वाटेत काही कारणास्तव तुमच्या कारचे चलन कापले गेले तर तुम्हाला नक्कीच मोठ्या नुकसानातून जावे लागते. पण, आज आम्ही तुम्हाला तुमच्या कारला चलन भरण्यापासून वाचवण्याचे काही साधे सोपे उपाय सांगणार आहोत. खरं तर हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनमध्ये गूगल मॅप्सची मदत घेऊ शकता.

ajit pawar sharad pawar (5)
11 / 30

अजित पवार म्हणाले, “गेल्या वेळी मी जरा एकटा पडलो होतो, पण यावेळी माझी आई…”!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला. बारामती मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवारांच्या पाठिंब्यावर युगेंद्र पवार आमनेसामने आहेत. अजित पवारांनी आपल्या सांगता सभेत कुटुंबाच्या पाठिंब्याचा उल्लेख केला. त्यांनी कार्यकर्त्यांना सडेतोड उत्तर देण्याचं आवाहन केलं आणि बारामतीचा मोठा परिवार वाढवण्याचं आवाहन केलं.

Dilip Joshi Asit Modi big fight on Taarak Mehta set
12 / 30

असित मोदींची कॉलर पकडली अन्…, दिलीप जोशींचे ‘तारक मेहता…’च्या निर्मात्यांशी भांडण

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही लोकप्रिय विनोदी मालिका गेली १६ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत जेठालाल गडा साकारणारे दिलीप जोशी आणि निर्माते असित मोदी यांच्यात जोरदार वाद झाला आहे. दिलीप जोशी सुट्ट्यांबद्दल बोलताना असित मोदींनी दुर्लक्ष केल्याने दिलीप चिडले. भांडण इतके वाढले की दिलीप यांनी असित मोदींची कॉलर ओढली. यापूर्वीही दोघांमध्ये वाद झाले आहेत.

Marathi actor Kishor mahabole share his experience about aai kuthe kay karte serial
13 / 30

“माणसं माझ्या पाया पडतात…”, अप्पांनी सांगितलं ‘आई कुठे…’ मालिकेमुळे त्यांना काय मिळालं?

नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अप्पा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते किशोर महाबोले यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये अप्पांनी ‘आई कुठे काय करते’ मालिकेने त्यांना काय दिलं? याविषयी सांगितलं आहे. ते म्हणाले, “नमस्कार, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने मला काय दिलं? थोडक्यात आईनं मला काय दिलं? आज महाराष्ट्रामध्ये फिरतो तेव्हा मला अप्पा म्हणून हाक मारतात.”

atul kulkarni maharashtra assembly election 2024
14 / 30

“आजच्याइतकी हतबुद्धता कधीही…”, अतुल कुलकर्णींची राजकीय स्थितीवर टोकदार भाष्य करणारी कविता!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये सामना असला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व दोन्ही बाजूंना आहे. या विचित्र परिस्थितीवर अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी कविता लिहिली आहे. त्यांनी राजकीय नेत्यांना समज देतानाच मतदार म्हणून आपल्या चुकांवरही बोट ठेवले आहे. मतदार म्हणून आपणही जबाबदार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Neena Gupta husband vivek mehra is CA
15 / 30

नीना गुप्ता यांचे पती कोण आहेत? काय करतात? अभिनेत्रीने ४९ व्या वर्षी केलेलं लग्न

नीना गुप्ता आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. करीना कपूरच्या 'व्हॉट वुमन वॉन्ट' शोमध्ये त्यांनी आर्थिक गुंतवणुकीबद्दल चर्चा केली. नीना यांचे पती विवेक मेहरा सीए आहेत आणि ते आर्थिक निर्णयांमध्ये मार्गदर्शन करतात. नीना म्हणाल्या की पैसा खूप महत्त्वाचा आहे आणि एफडीमध्ये गुंतवणूक करणे त्यांना सुरक्षित वाटते. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये 'मेट्रो इन दिनों', 'पचहत्तर का छोरा', 'हिंदी विंदी' यांचा समावेश आहे.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
16 / 30

Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक…’ मालिकेतील सूर्याचा मित्रांबरोबर भन्नाट डान्स

अभिनेता नितीश चव्हाण ( Nitish Chavan ) आणि अभिनेत्री दिशा परदेशीने ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मालिकेत नितीशने सूर्यकांत जगताप ( सूर्यादादा ) आणि दिशाने तुळजाची भूमिका निभावली आहे. दोघांचं पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. तसंच इतर पात्र देखील घराघरात पोहोचली आहे. अशातच दुसऱ्या बाजूला सूर्यादादाने जीवलग मित्र काजू आणि पुड्याबरोबर जबरदस्त डान्स केला आहे. या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

Budh uday 2024 | vrishchik rashi budh uday
17 / 30

१२ डिसेंबरपासून बुधाच्या वृश्चिक राशीतील उदयाने ‘या’ राशींची चांदी! मिळणार पैसा, मानसन्मान

 ग्रहांचा राजकुमार बुध ठरावीक काळानंतर राशी बदलतो आणि त्यामुळे परिस्थिती बदले; ज्याचा परिणाम प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर होत असतो. हा परिणाम प्रत्येक राशीसाठी शुभ किंवा अशुभ ठरू शकतो. २९ नोव्हेंबरपासून बुध वृश्चिक राशीत वक्री होणार आहे, जो १४ दिवस या स्थितीत राहील. त्यानंतर डिसेंबरच्या शेवटी बुधाचा अस्त होईल. बुधाच्या अस्तामुळे काही राशींच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात; तर काही राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Kashmera Shah accident
18 / 30

अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखलेला फोटो केला शेअर

कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाहचा अपघात झाला आहे. तिने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेला फोटो शेअर करून ही माहिती दिली. कश्मीरा थोडक्यात बचावली असून, तिने देवाचे आभार मानले आहेत. "भयंकर अपघातातून वाचले," असे तिने लिहिले आहे.

rahul gandhi press conference maharashtra election result 2024
19 / 30

Video: राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून एक बॅनर काढून दाखवत म्हणाले…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस व इतर पक्ष आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींनी मुंबईत पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांनी महाराष्ट्रातील निवडणूक विचारसरणीची असल्याचं सांगितलं व शेतकरी, गरीब, बेरोजगारांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी महिलांसाठी ३ हजार रुपये, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी यांसारखी आश्वासनं दिली. धारावी अदाणींना देण्याचा आरोप करत, मोदी-अदाणी संबंधांवर टीका केली.

bhagare guruji son akhilesh bhagare get married with vaishnavi Jadhav wedding video viral
20 / 30

Video: शुभमंगल सावधान! भगरे गुरुजींच्या मुलाचं थाटामाटात पार पडलं लग्न, पाहा व्हिडीओ

Akhilesh Bhagare Wedding : प्रसिद्ध पंडित अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा मुलगा अखिलेश भगरे अखेर लग्नबंधनात अडकला आहे. मोठ्या थाटामाटात अखिलेशचा लग्नसोहळा पार पडला. मेहंदी, हळद, साखरपुडा असे सर्व समारंभ पारपंरिक पद्धतीने पार पडले. याचे फोटो आणि व्हिडीओ अखिलेशची बहीण अभिनेत्री अनघा अतुलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Diljit Dosanjh says ban liquor where he is doing concert
21 / 30

Video: “बॉलीवूड कलाकार दारूच्या…”; दिलजीत दोसांझची भर कार्यक्रमात टीका

बॉलीवूड November 18, 2024

लोकप्रिय गायक व अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या 'DIL-LUMINATI TOUR 24' मुळे चर्चेत आहे. अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये त्याने दारूवरील गाण्यांवर आलेल्या नोटिसबद्दल प्रतिक्रिया दिली. दिलजीतने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून सरकारला आव्हान दिलं. त्याने धार्मिक गाण्यांबद्दल कुणीच बोलत नसल्याचं सांगितलं. बॉलीवूड कलाकार दारूची जाहिरात करतात, पण तो करत नाही. दिलजीतने दारूबंदीची चळवळ सुरू करण्याचं आवाहन केलं.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
22 / 30

‘नायतर आम्हाला कुत्रं विचारणार नाही’, भरसभेतच अजित पवार भडकले, पोलिसांवर व्यक्त केला संताप

अजित पवार यांनी भोर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यावर जोरदार टीका केली आणि भोरच्या विकासाच्या अभावावर प्रश्न उपस्थित केले. पोलिसांवरही नाराजी व्यक्त केली.

budhaditya rajyog 2024 | rajyog in horoscope astrology
23 / 30

१७ नोव्हेंबरनंतर बुधादित्य राजयोगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे उत्पन्न होणार दुप्पट वाढ!

ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशिबदल करीत असतो. अनेकदा दोन ग्रहांच्या एका राशीतील परिवर्तनामुळे राजयोग तयार होतो; ज्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीतीने परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होतो. त्यात ग्रहांचा राजकुमार असलेल्या बुधाने २९ ऑक्टोबरला वृश्चिक राशीत प्रवेश केला. त्यानंतर आता १७ नोव्हेंबरला ग्रहांचा राजा म्हटला जाणारा सूर्यदेवाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे, या दोन ग्रहांच्या एकाच राशीतील संयोगामुळे आता बुधादित्य राजयोग तयार होत आहे. अशा स्थितीत या राजयोगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.

sharad pawar narendra modi maharashtra cidhan sabha election 2024
24 / 30

शरद पवार व नरेंद्र मोदींची लग्नरास एकच; दोघांमध्ये साम्य काय? काय म्हणतात ज्योतिषतज्ज्ञ…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या राजकीय साम्य व फरकांवर ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांना आगामी काळात यश व प्रसिद्धी मिळेल, असं भाकित त्यांनी वर्तवलं आहे. पवार आणि मोदी यांच्यात राजकीय शत्रूंवर मात करण्याचं कसब आहे. दोघांची लग्नरास वृश्चिक असल्यामुळे काही बाबतीत साम्य आहे. मात्र, मतदारराजाचा कौलच त्यांच्या भविष्याचा निर्णय करेल.

Sharad pawar on ajit pawar
25 / 30

“नाद करायचा नाय….”, पक्ष सोडून गेलेल्या आमदारांना शरद पवारांचा इशारा; भर सभेत म्हणाले…

शरद पवार : निवडणूक प्रचारासाठी आज अंतिम रविवार. विविध पक्षातील नेत्यांकडून आक्रमक भाषणं केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना इशारा दिला. २०२३ मध्ये पक्षात फूट पडली होती. १९८० सालीही त्यांनी अशाच अनुभवाचा सामना केला होता. तेव्हा सोडून गेलेल्या आमदारांचा पराभव केला होता. "सगळ्यांचा नाद करायचा, पण शरद पवारांचा नाही," असं समर्थकांनी म्हटलं.

rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
26 / 30

वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!

लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भारतीय जनता पक्ष (भाजपा) यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. जे. पी. नड्डा यांच्या विधानामुळे ही दरी वाढली. महाराष्ट्रात अजित पवारांना सत्तेत घेतल्यामुळे आरएसएसने नाराजी व्यक्त केली. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आरएसएसची मदत घेतल्यामुळे ही दरी निवडणुकीपुरती मिटल्याचं दिसतं. आरएसएसचे स्वयंसेवक भाजपा महायुतीसाठी प्रचार करत आहेत.

Amit Shah Rally cancle
27 / 30

अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील सभा रद्द; शेवटच्या दिवसांत प्रचार करणार नाहीत, कारण काय?

मणिपूरमध्ये पुन्हा उसळलेल्या हिंसाचारामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराच्या सभा रद्द केल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, गडचिरोली आणि वर्धा येथे त्यांच्या सभा होणार होत्या. मणिपूरमध्ये तीन महिला आणि तीन मुलांच्या हत्येनंतर परिस्थिती चिघळली आहे. अमित शाह यांच्या जागी शिवराज सिंग चौहान आणि स्मृती इराणी या ठिकाणी सभा घेणार आहेत.

Congress Complete Candidate List in Marathi
28 / 30

राष्ट्रीय पक्षांचा राज्यात तंटा, महाराष्ट्रात ‘इतक्या’ ठिकाणी काँग्रेस भाजपाला थेट भिडणार!

महाराष्ट्रात जागावाटपात जरी काँग्रेसनं शंभरीपार मजल मारली असली, तरी त्यातल्या जवळपास ७७ जागांवर काँग्रेस भाजपाला शिंगावर घेण्यासाठी सज्ज झाली आहे. त्याचवेळी समोरच्या बाजूनेही काँग्रेसशी थेट लढतीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक महाराष्ट्र विधानसभेची असली, तरी २८८ पैकी तब्बल ७७ जागांवर दोन्ही राष्ट्रीय पक्ष एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असल्याचं पाहायला मिळत आहे.

What Uddhav Thackeray Said About Raj Thackeray ?
29 / 30

“राज ठाकरेंशी युती करणं शक्यच नाही, महाराष्ट्र द्रोही..”, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका करत म्हटलं की, भाजपाने राजकारणाचा विचका केला आहे. महाराष्ट्राने काय करायचं ते ठरवलं असून २३ नोव्हेंबरला ते समजेल. त्यांनी अजित पवार आणि मिंधे यांच्या बंडखोरीबद्दलही भाष्य केलं. राज ठाकरेंशी युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं. मोदी-शाह यांचं महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचं कारस्थान असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Supriya Sule on GOd
30 / 30

नवरात्रीचे नऊ दिवस उपवास अन् पांडुरंगांवर भाबडं प्रेम; सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पांडुरंगावर असलेल्या त्यांच्या श्रद्धेबद्दल सांगितले. त्यांच्या आई आणि सासू मर्यादित श्रद्धाळू आहेत, पण सुप्रिया सुळे यांची पांडुरंगावर प्रचंड श्रद्धा आहे. त्यांनी जावयाचे पाय धुण्याच्या प्रथेवरही टीका केली आणि सुचवले की अधिक महिन्यात जोडप्याने आपल्या पालकांचे पाय धुवावेत. त्यांनी आपल्या श्रद्धा कोणावरही लादत नसल्याचेही स्पष्ट केले.