Video: चैतन्य देवढेच्या परफॉर्मन्सने श्रेया घोषाल झाली भावुक, पाहा प्रोमो
म्युझिक रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल’चं १५ वं पर्व सध्या खूप चर्चेत आहे. हे पर्व अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. एकूण सहा स्पर्धक या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत. चैतन्य देवढे, स्नेहा शंकर, शुभोजित चक्रवर्ती, प्रियांशु दत्ता, मानसी घोष व अनिरुद्ध सुस्वरम या सहा जणांमधून ‘इंडियन आयडॉल’च्या १५ व्या पर्वाचा विजेता कोण होतंय? हे पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, गेल्या आठवड्यातील आळंदीच्या चैतन्य देवढेचा परफॉर्मन्स पाहून श्रेषा घोषाल भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.