महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावल्यानंतर राखीची प्रतिक्रिया, म्हणाली, “मी गरीब आहे…”
समय रैनाचा वादग्रस्त कार्यक्रम ‘इंडियाज गॉट लेटेंट’ ( India’s Got Latent ) प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला ( Rakhi Sawant ) समन्स बजावला आहे. २७ फेब्रुवारीला तिला जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या राखी सावंत चर्चेत आली आहे. महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावल्यानंतर राखी सावंतची प्रतिक्रिया समोर आली आहे.