Video: एकाच मालिकेतील तिसऱ्या अभिनेत्रीने दिली गुड न्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई
'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री रुही चतुर्वेदीने चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे की ती लवकरच आई होणार आहे. तिने एक व्हिडीओ पोस्ट करून ही गुड न्यूज दिली. रुहीने २०१९ मध्ये शिवेंद्र सैनीयोलशी लग्न केले होते आणि आता पाच वर्षांनी ती आई होणार आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत. रुही 'कुंडली भाग्य'मधील तिसरी अभिनेत्री आहे जी आई होणार आहे.