‘कुंडली भाग्य’ फेम तिसऱ्या अभिनेत्रीच्या घरी लेकीचा जन्म, लग्नानंतर पाच वर्षांनी झाली आई
'कुंडली भाग्य' फेम अभिनेत्री रुही चतुर्वेदीच्या घरी चिमुकल्या मुलीचं आगमन झालं आहे. रुहीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली. श्रद्धा आर्या, सना सय्यद पाठोपाठ रुहीदेखील आता आई झाली आहे. रुही व तिचा पती शिवेंद्र सैनीयोल यांच्या घरी ९ जानेवारी २०२५ रोजी मुलीचा जन्म झाला. रुहीने २०१९ मध्ये शिवेंद्रशी लग्न केलं होतं.