“ना शितली, ना जयडी…”, किरण-वैष्णवीला ‘लागिरं झालं जी’च्या टीमकडून हटके शुभेच्छा
Kiran Gaikwad And Vaishnavi Kalyankar Wedding: ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड नुकताच लग्नबंधनात अडकला. १४ डिसेंबरला किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. मालवणात मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला आणि अखेर किरण गायकवाड सावंतवाडीचा जावई झाला. त्यामुळे सध्या किरण आणि वैष्णवीच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तसंच दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.