‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील रम्या आहे व्यावसायिक ज्योतिषी व वास्तुतज्ज्ञ
'लग्नानंतर होईलच प्रेम' या मालिकेतून अभिनेत्री मृणाल दुसानिसने टीव्हीवर पुनरागमन केलं आहे. या मालिकेत कश्मिरा कुलकर्णी रम्याची भूमिका साकारत आहे. कश्मिरा एक व्यावसायिक ज्योतिषी व वास्तुतज्ज्ञ आहे. तिने 'काव्याअंजली' मालिकेतून मोठ्या ब्रेकनंतर पुनरागमन केलं होतं. अभिनयासोबतच ती ज्योतिषशास्त्रातही रस घेते आणि लोकांना मार्गदर्शन करते. कश्मिराने 'काव्यांअंजली,' 'ढोलकी', 'कॅरी ऑन मराठा' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.