‘लक्ष्मी निवास’ फेम मीनाक्षी राठोडसाठी नवऱ्याने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…
‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेने अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मोठी स्टारकास्ट असणारी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आता घराघरात पोहोचलं आहे. आज ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील वीणा म्हणजे अभिनेत्री मीनाक्षी राठोडचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिच्या नवऱ्याने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.