प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “४ वर्षे…”
टीव्ही अभिनेता अरुण सिंह राणा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने घटस्फोट झाल्याचे सांगितले. लग्न मोडल्यानंतर त्याने नैराश्याचा सामना केला, पण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे खंबीर राहिला. आत्महत्येच्या विचारांवर मात करत, अरुणने कधीही हार न मानण्याचे महत्त्व सांगितले. २०२५ मध्ये करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची त्याची योजना आहे. अरुणने 'महाभारत', 'दीया और बाती हम' आणि 'नागिन 6' मध्ये काम केले आहे.