“विकृतीची परिसीमा…”, संतोष देशमुख प्रकरणावर पृथ्वीक प्रताप, सचिन गोस्वामींच्या पोस्ट
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकारण तापलं आहे. हत्या करताना दिलेल्या त्रासाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी संतोष देशमुखांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी ठरवून दोषारोप पत्र दाखल केले आहे.