लोकप्रिय मराठी अभिनेत्याने केला साखरपुडा, होणारी पत्नी आहे डेंटिस्ट; फोटो पाहिलेत का?
मराठी अभिनयविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. 'लक्ष्मी निवास' फेम दिव्या पुगावकर आणि बिग बॉस मराठी फेम अंकिता प्रभू वालावलकर यांचे आज लग्न आहे. अभिनेता कुणाल धुमाळने साखरपुड्याची बातमी शेअर केली आहे. त्याची होणारी पत्नी डॉ. सोनाली काजबे डेंटल सर्जन आहे. कुणाल व सोनालीने पारंपरिक पद्धतीने साखरपुडा केला. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.