Video: नव्या मालिकेचा प्रोमो पाहताच मराठमोळ्या अभिनेत्यावर प्रेक्षक भडकले, नेमकं काय घडलं?
झी टीव्हीवर लवकरच 'तुमसे तुम तक' ही मालिका येणार आहे. या मालिकेचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर मराठमोळा अभिनेता शरद केळकर ट्रोल होत आहे. कारण मालिकेतील मुख्य अभिनेत्री निहारिका चौकसे ही त्याच्यापेक्षा २७ वर्षांनी लहान आहे. प्रोमोमध्ये अनु आणि आर्य वर्धन यांच्या प्रेमकथेची झलक दिसते. नेटकऱ्यांनी वयातील अंतरामुळे नाराजी व्यक्त केली असून, काहींनी मालिकेला 'तुला पाहते रे'ची रिमेक म्हटलं आहे.