“तब्बल ९० दिवसानंतर मिळणारं पेमेंटही…”, मराठी अभिनेता मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणाला…
अभिनेता उमेश बनेने मराठी मालिका व चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची अवस्था भिकाऱ्यांसारखी असल्याची पोस्ट केली आहे. त्याने ९० दिवसांनंतरही पेमेंट वेळेवर न मिळण्याची खंत व्यक्त केली आहे. उमेश बनेने इतर दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कला क्षेत्रातील पीडितांना आपली व्यथा मांडण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून त्यांचे म्हणणे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचेल.