‘अशोक मा.मा.’ मालिकेतून ‘या’ अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती
‘कलर्स मराठी’ची ‘अशोक मा.मा.’ मालिका अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अशोक मा.मा., ईरा, ईशान, भैरवी, फुलराणी ही पात्र आता घराघरात पोहोचली आहेत. पण, अशातच या मालिकेतील एका अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे. याबाबत तिने स्वतः सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.