खुशबू तावडे-संग्राम साळवीच्या लग्नाला ७ वर्षे पूर्ण! अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट,
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे खुशबू तावडे आणि संग्राम साळवी. गेल्या वर्षी दोघं दुसऱ्यांदा आई-बाबा झाले. खुशबूने २ ऑक्टोबर २०२४ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्याआधी खुशबू आणि संग्रामला एक मुलगा आहे. त्याचं राघव नाव असून तो आता तीन वर्षांचा आहे. आज खुशबू आणि संग्रामच्या लग्नाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने खुशबूने नुकतीच इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.