“नचिकेत दुसरं लग्न करेल”, शिवजयंतीला लिहिलेल्या पोस्टवरून नेहा शितोळे ट्रोल, म्हणाली…
१९ फेब्रुवारीला संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने शिवजयंती साजरी केली. यानिमित्ताने मराठी कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वात झळकलेल्या नेहा शितोळेने अनोख्या अंदाजात शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तिने पोस्टमधून स्वतःचं परखड मत मांडत शिवरायांकडे आधुनिक मावळ्यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना केली. या पोस्टमुळे नेहा शितोळे सध्या चर्चेत आली असून तिला ट्रोल केलं जात आहे. एका नेटकऱ्याने तर तिला थेट शाप दिला आहे.