सईने ‘हास्यजत्रे’मधील तिघांचं केलं कौतुक; एकाला म्हणाली, ‘सुपीक जमीन’, तर दुसऱ्याला…
आजपासून ‘सोनी मराठी’वरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक!’ हे नवं पर्व सुरू होतं आहे. या नव्या पर्वात पुन्हा एकदा परीक्षक म्हणून सई पाहायला मिळणार आहे. अशातच सईने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील समीर चौघुले, सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांचं तीन शब्दांत कौतुक केलं आहे.