पांढरी साडी, गळ्यात मोत्याच्या माळा अन्…; शिवानी सोनारला लागली हळद, लूकने वेधलं लक्ष
गेल्या वर्षा अखेरीस बऱ्याच मराठी कलाकार मंडळींनी लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. अभिनेत्री रेश्मा शिंदे, किरण गायकवाड, अभिषेक गावकर, कौमुदी वलोकर, हेमल इंगळे या कलाकारांचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पाहायला मिळाला. त्यानंतर आता मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय जोडी लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्री शिवानी सोनार आणि अभिनेता अंबर गणपुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबरला हळद लागली. त्यानंतर आता शिवानीलादेखील उष्टी हळद लागली आहे.