तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार…
मराठी मालिकाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान. तेजश्रीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने एक स्वतंत्र्य स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे तिची कोणतीही मालिका असो, त्याला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देताना दिसतात. तेजश्री आता मालिकेसह सिनेसृष्टीतही अधिक सक्रिय झाली आहे. सध्या तिच्या ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसंच दुसऱ्या बाजूला ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. पण अशातच तेजश्रीने मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे.